‘दर्शनदुर्लभ’ गाडय़ा..
- 1 / 11
रस्त्यावरून दुडुदुडु धावणाऱ्या सुमारे शतकापूर्वीच्या मोटरसायकल्सनी तर रसिकांना भुरळच घातली होती. निमित्त होते व्हिंटेज अॅण्ड क्लासिक कार क्लब ऑफ इंडियातर्फे आयोजित करण्यात आलेल्या 'व्हिंटेज कार फिएस्टा २०१४'चे. (छाया- गणेश शिर्सेकर)
- 2 / 11
मुंबईकरांचे आकर्षण बनलेल्या या रॅलीमधील व्हिंटेज कार गटात 'द इंडियन एक्स्प्रेस लिमिटेड'चे अध्यक्ष विवेक गोएंका यांच्या १९३३ सालच्या दिमाखदार स्टडबेकर गाडीने प्रथम क्रमांक पटकावला (छाया- गणेश शिर्सेकर)
- 3 / 11
आकर्षक रंगसंगती आणि भुरळ पाडणाऱ्या गाडय़ांची छायाचित्रे घेण्यात अनेक रसिक मंडळी दंग होती (छाया- गणेश शिर्सेकर)
- 4 / 11
फैझ परवेझ व्होरा यांची १९१५ सालातील दिमाखदार फोर्ड गाडी हॉर्निमन सर्कल सोडून चेंबूरच्या दिशेने कूच करू लागली. त्यापाठोपाठ हळूहळू एकेका गाडीला सिग्नल मिळत गेला आणि व्हिंटेज कार आपल्या गतीनुसार चेंबूरच्या दिशेने मार्गस्थ झाल्या. विशेष म्हणजे १९४० ते १९८० काळातील, तसेच २०१३ पर्यंत निर्मिती झालेल्या अनेक वाहनांचा या रॅलीत समावेश होता. (छाया- गणेश शिर्सेकर)
- 5 / 11
गेट वे ऑफ इंडिया, मरिन ड्राईव्ह, पेडर रोड, हाजीअली, वरळी, प्रभादेवी, प्लाझा, दादर टीटीमार्गे व्हिंटेज कार आणि मोटरसायकली चेंबूरला रवाना होत होत्या (छाया- गणेश शिर्सेकर)
- 6 / 11
रस्त्यावरून दुडुदुडु धावणाऱ्या सुमारे शतकापूर्वीच्या मोटरसायकल्सनी तर रसिकांना भुरळच घातली होती. (छाया- गणेश शिर्सेकर)
- 7 / 11
मर्सिडिझ बेन्झ, रोल्स रॉईस, ऑस्टिन, स्टडबेकर, लॅण्ड रोव्हर, शेव्हरोले, जॅग्वार, बेन्टले, डॉज ब्रदर्स, मॉरिस, हिल्मन, ब्यूक आदी नामवंत कंपन्यांच्या विविध आकारांच्या अन् आकर्षक रंगांच्या मोटरगाडय़ा रविवारी रस्त्यावर धावू लागल्या आणि मुंबईकरांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. (छाया- गणेश शिर्सेकर)
- 8 / 11
मॉर्निग वॉकसाठी घरातून बाहेर पडलेले अनेक मुंबईकर राजेशाही थाटातील या गाडय़ांच्या दर्शनाने तृप्त झाले. तर सुट्टीचा दिवस असूनही हॉर्निमन सर्कल गजबजून गेले होते (छाया- गणेश शिर्सेकर)
- 9 / 11
व्हिंटेज अॅण्ड क्लासिक कार क्लब ऑफ इंडियातर्फे (व्हीसीसीसीआय) आयोजित करण्यात आलेल्या 'व्हिंटेज कार फिएस्टा २०१४'मध्ये सहभागी होण्यासाठी रविवारी सकाळी सातपासून हॉर्निमन सर्कलच्या दिशेने व्हिंटेज कार धावू लागल्या (छाया- गणेश शिर्सेकर)
- 10 / 11
वाटेतील मोठय़ा चौकांमध्ये वाहतूक नियमनासाठी तैनात असलेले वाहतूक पोलीसही रॅलीतील वाहनांचे स्वागत करीत होते. टप्प्याटप्प्यावर आयोजक प्रतिनिधी वाहनांची नोंद करीत होते. (छाया- गणेश शिर्सेकर)
- 11 / 11
गेट वे ऑफ इंडिया, मरिन ड्राईव्ह, पेडर रोड, हाजीअली, वरळी, प्रभादेवी, प्लाझा, दादर टीटीमार्गे व्हिंटेज कार आणि मोटरसायकली चेंबूरला रवाना होत होत्या (छाया- गणेश शिर्सेकर)