-
सर्वांचाच आवडता सण म्हणजेच गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला आहे. काही दिवसांमध्ये आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन होणार आहे. (File Photo)
-
यासाठीची तयारी आता शेवटच्या टप्प्यावर असून बाजारामध्ये यासाठीची लगबग पाहायला मिळत आहे. (PTI)
-
तुम्हीही गणपती बाप्पाचे भक्त असाल तर यावर्षी तुम्ही महाराष्ट्रातील काही प्रसिद्ध गणेश मंदिरांना भेट देऊन गणपतीचे दर्शन घेऊ शकता. ही ठिकाणं कोणती आहेत ते जाणून घेऊया. (Jansatta)
-
मुंबईतील सर्वात उल्लेखनीय आणि सुप्रसिद्ध मंदिरांपैकी एक म्हणजे सिद्धिविनायक मंदिर. गणेशाला समर्पित हे मंदिर दादरच्या प्रभादेवी परिसरात आहे. (Instagram : @siddhivinayakmandirmumbai)
-
असा दावा केला जातो की येथील गणपतीची मूर्ती स्वयंभू असून ती भक्तांच्या इच्छा पूर्ण करते. (Instagram : @siddhivinayakmandirmumbai)
-
या मंदिरात वर्षाचे बारा महिने गर्दी असली तरी मंगळवारी येथील गर्दीचे नियोजन करण्यासाठी विशेष व्यवस्था केली जाते. (Instagram : @siddhivinayakmandirmumbai)
-
सिद्धिविनायक मंदिरात प्रख्यात राजकारणी आणि ख्यातनाम व्यक्ती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी वारंवार येतात. (Instagram : @siddhivinayakmandirmumbai)
-
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर पुण्यात आहे. येथील गणेशोत्सवासाठी हे मंदिर ओळखले जाते. पुण्यातील पाच मनाच्या गणपतींमध्ये या गणपतीचा समावेश होतो. (Instagram : _shreemant_dagdusheth)
-
येथील गणेश मूर्तीला जवळपास आठ किलोचे दागिने घालण्यात येतात. हे सर्व दागिने भक्तांकडून देण्यात आले आहेत. (Instagram : _shreemant_dagdusheth)
-
हे मंदिर दीर्घ आणि समृद्ध भूतकाळाचे साक्षीदार आहे. गणेश उत्सवादरम्यान, हे मंदिर भव्य रोषणाईने सजवले जाते. (Instagram : _shreemant_dagdusheth)
-
महाराष्ट्रातील अष्टविनायक मंदिरांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. (Instagram : mayureshwarganpatimorgaon)
-
यामध्ये ओझरमधील विघ्नेश्वर मंदिर, महाडमधील वरदविनायक मंदिर, सिद्धटेक येथील सिद्धिविनायक मंदिर, रांजणगाव येथील महागणपती मंदिर, जुन्नर येथील लेण्याद्रीच्या डोंगरामध्ये वसलेले गिरिजात्मक मंदिर, थेऊर येथील चिंतामणी मंदिर, पाली येथील बल्लाळेश्वर मंदिर आणि मोरगाव येथील मोरेश्वर मंदिरचा समावेश होतो. (File Photo)
-
येथे दरवर्षी हजारो भक्त दर्शन घेण्यासाठी पोहचतात. (Instagram : mayureshwarganpatimorgaon)
-
कसबा गणपती मंदिर हे पुणे येथे स्थित एक प्रसिद्ध मंदिर आहे. (Instagram : bappamajapune30)
-
रत्नागिरी येथील गणपतीपुळे मंदिरही अतिशय प्रसिद्ध आहे. समुद्रकिनाऱ्यावर वसलेल्या या मंदिराला सुंदर निसर्गसौंदर्य लाभले आहे. (ganpatipule.co.in)

पावसाळ्यात घरात बाथरुममधून गोम, गांडूळ येतात? मग फॉलो करा फक्त ‘या’ 3 ट्रिक्स, पुन्हा दिसणार नाही