-
अवघ्या काही तासांमध्ये आपला लाडका बाप्पा आपल्याला भेटायला येणार आहे.
-
अशातच सगळीकडे बाप्पाच्या आगमनाची लगबग पाहायला मिळतेय.
-
अभिनेत्री पूजा सावंतनेही बाप्पाच्या आगमनाची जय्यत तयारी केली आहे.
-
यासंबंधीचे फोटो तिने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत.
-
यावेळी पूजाने सुंदर भगव्या रंगाची साडी नेसली आहे.
-
या साडीवर फुलांचं सुंदर नक्षीकाम केलेलं आहे.
-
त्याचबरोबर पूजाने सुंदर नक्षीदार हिरव्या रंगाचं ब्लाऊज घातलं आहे.
-
पूजाने गळ्यात सुंदर नेकलेस, नाकात नाथ आणि कपाळावर सुंदर चंद्रकोर लावली आहे.
-
यावेळी तिने बाप्पाबरोबर सुंदर फोटोशूट केलंय.
-
बाप्पासाठी पांढऱ्या फुलांची सुंदर सजावट केली असून बाप्पाला पाळण्यावर बसवलं आहे.
-
पूजाचे हे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत.
-
सर्व फोटो : पूजा सावंत/इन्स्टाग्राम

बारामतीतून अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार निवडणूक लढवणार? सुप्रिया सुळेंनी केलं स्वागत, म्हणाल्या…