-
गणेश चतुर्थीच्या या पावन सणा निमित्ताने अनेक कलाकार आपल्या गावी जाऊन कुटुंबासोबत बाप्पाचा उत्सव साजरा करत आहेत.
-
बॉलीवूड अभिनेत्री शर्वरी वाघसुद्धा गणेशोत्सवाचा हा आनंद लुटण्यासाठी खास तिच्या मूळ गावी पोहोचली आहे.
-
अभिनेत्री शर्वरी वाघ ही मूळची पुण्याजवळील मोरगाव येथील असून दरवर्षी ती गणेशोत्सवासाठी आवर्जून गावी जाते.
-
गावी गेल्यानंतर शर्वरीने तिच्या या पारंपारिक गणेशोत्सवाचे काही सुंदर आणि खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
शेअर केलेल्या फोटोंमध्ये शर्वरीने गुलाबी रंगाची पारंपरिक साडी नेसून अतिशय मनमोहक आणि सुंदर लूक केला आहे.
-
साडीसोबत तिने मॅचिंग बांगड्या, कानात पारंपारिक झुमके आणि कपाळावर छोटीशी टिकली लावून आपला लूक पूर्ण केला आहे.
-
या सुंदर फोटोंच्या सोबतच शर्वरीने तिच्या आई आणि बहिणींबरोबरचे पारंपारिक पोशाखातील खास क्षणही चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
-
शर्वरीने हे फोटो शेअर करत ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया Happy Ganesh Chaturthi’ अशी अत्यंत सुंदर कॅप्शन दिली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: शर्वरी वाघ/इन्स्टाग्राम)
छातीत साठलेला कफ, जुनाट खोकला ३ दिवसांत बाहेर पडेल! करा ‘हे’ ३ सोपे घरगुती उपाय; चोंदलेलं नाक उघडेल अन् जड झालेली छाती होईल मोकळी!