-
देशभरात सर्वत्र गणेश चतुर्थीचा सण अत्यंत थाटामाटात साजरा केला जात असून, मोठ्या उत्साहात बाप्पाचे आगमन झाले आहे.
-
राज्यातील अनेक प्रमुख राजकीय नेत्यांच्या घरीदेखील गणपती बाप्पाचे मंगलमय वातावरणात आगमन झाले आहे.
-
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी मोठ्या जल्लोषात आणि भक्तिभावात श्रींचे आगमन झाले.
-
मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी बाप्पाचे शास्त्रोक्त पद्धतीने आणि मंगलमय वातावरणात आगमन झाले.
-
या खास प्रसंगी उद्धव ठाकरे यांच्यासह त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने गणपती बाप्पाचे मनोभावे दर्शन घेतले.
-
दुसरीकडे राज्यातील इतरही अनेक प्रमुख नेत्यांच्या घरी गणरायाचे अत्यंत दिमाखात आणि उत्साहात जोरदार स्वागत करण्यात आले.
-
भाजपाचे नेते गिरीश महाजन यांच्या निवासस्थानीदेखील गणपती बाप्पा विराजमान झाले असून, तिथेही भक्तिमय वातावरण पाहायला मिळत आहे.
-
भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्या ‘रामटेक’ या शासकीय बंगल्यावर विघ्नहर्त्या गणपती बाप्पाची पारंपरिक पद्धतीने प्रतिष्ठापना झाली.
-
भाजपाच्या प्रदेश प्रवक्त्या चित्रा वाघ यांच्या घरी बाप्पाचे आगमन झाले असून, त्यांनी श्रींच्या मूर्तीची मनोभावे पूजा-अर्चा केली.
-
केन्द्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी गणेश चतुर्थीच्या पावन मुहूर्तावर आपल्या घरच्या बाप्पाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
-
मुंबईच्या महापौरांनी श्रीगणेश चतुर्थीच्या पावन पर्वावर महापौर निवासस्थानी विघ्नहर्त्या श्रीगणरायाची अत्यंत भक्तिभावाने आणि मंगलमय वातावरणात प्रतिष्ठापना केली.
-
भारतीय जनता पार्टीचे खासदार धनंजय महाडिक यांच्या घरीदेखील गणपती बाप्पाचे अत्यंत थाटामाटात आगमन झाले आहे.
-
(सर्व फोटो- आमदार, मंत्री, नेते यांच्या सोशल मीडियावरुन साभार)
घराच्या भिंतीत, छतावर किंवा पाईपच्या फटीत उगवलेलं वड वा पिंपळाचं झाड निघेल मुळासकट! मिठासह ‘हे’ सोपे उपाय करा; क्षणात होईल बंदोबस्त