-
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी दरवर्षाप्रमाणे यंदाही श्री गणरायाचे मोठ्या थाटामाटात आणि भक्तिमय वातावरणात आगमन झाले आहे.
-
या मंगलमयी प्रसंगी देवेंद्र फडणवीस यांनी पत्नी अमृता फडणवीस, मुलगी दिविजा आणि आई यांच्यासोबत एकत्र येत बाप्पाची विधिवत पूजा व आरती केली.
-
सोहळ्याच्या समोर आलेल्या फोटोंमध्ये बाप्पाच्या आकर्षक मूर्तीसमोर संपूर्ण कुटुंब अत्यंत श्रद्धेने हात जोडून उभे असल्याचे पाहायला मिळत आहे.
-
या संपूर्ण पूजा सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि मुलगी दिविजा यांच्या पारंपरिक लूकने नेटकर्यांचे लक्ष वेधून घेतले.
-
अमृता फडणवीस यांनी सणाच्या औचित्याने पिवळ्या आणि लाल रंगाची सुरेख पारंपरिक साडी नेसली असून त्यावर शोभून दिसणारे आकर्षक दागिने घातले आहेत.
-
मुलगी दिविजा हिने लाल काठ असलेली पांढऱ्या रंगाची सुंदर साडी नेसून अत्यंत नीटनेटक्या आणि सोज्वळ रूपात हजेरी लावली आहे.
-
दिविजाचा हा साधेपणा, गळ्यात घातलेला नाजूक हार आणि तिची साडी नेसण्याची पद्धत सध्या सोशल मीडियावर चांगलीच पसंत केली जात आहे.
-
सोहळ्याच्या समोर आलेल्या फोटोंमध्ये बाप्पाच्या आकर्षक मूर्तीसमोर संपूर्ण कुटुंब अत्यंत श्रद्धेने हात जोडून उभे असल्याचे पाहायला मिळत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: देवेंद्र फडणवीस/इन्स्टाग्राम)
रोज आंघोळ करणं ठीक, पण साबण रोज लावणं गरजेचं आहे का? त्वचारोगतज्ज्ञ काय सांगतात?