-
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानी श्री गणरायाची अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.
-
या गणेशोत्सवाच्या शुभ प्रसंगी अंबानी कुटुंबाची धाकटी सून राधिका मर्चंट हिने केलेला पारंपरिक लूक सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आला आहे.
-
प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांनी राधिकाच्या या देखण्या लूकचे फोटो स्वतःच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत.
-
राधिकाने या उत्सवासाठी खास राणी पिंक रंगाची हँडवोव्हन कांजीवरम सिल्क (Handwoven Kanjeevaram Silk) साडी परिधान केली होती.
-
तिच्या या साडीवर सोन्याच्या धाग्यांचे (जरीचे) नाजूक एम्ब्रॉयडरी नक्षीकाम केलेले असून, त्यावर एक रॉयल कमरपट्टा अतिशय शोभून दिसत आहे.
-
या पेहरावावर तिने गळ्यात हिरे आणि पाचू (Emerald) जोडलेला हार परिधान करून आपला लूक अधिक आकर्षक केला आहे.
-
त्याशिवाय तिने डोक्यावर पारंपरिक शीशपट्टी (माथापट्टी) लावून केसांची सुरेख रचना केली होती, ज्यामुळे तिला एक शाही रूप प्राप्त झाले.
-
नाकात नाजूक नथ आणि हातात भरगच्च कडे-बांगड्या परिधान करून, तिने गणेशोत्सवाचा हा पारंपरिक लूक पूर्ण केला होता. (सर्व फोटो सौजन्य: मनिष मल्होत्रा/इन्स्टाग्राम)
Video: नाना पाटेकरांना शेवटचं डोळे भरून पाहताना पत्नी निलकांती पाटेकर, भावुक व्हिडीओ व्हायरल