-
मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानी गणपती बाप्पाचे आगमन झाले असून, बाप्पाच्या दर्शनासाठी अभिनेत्री जिनिलीया देशमुख हिने खास हजेरी लावली आहे.
-
गणेशोत्सवाच्या या शुभप्रसंगानिमित्त जिनिलीयाने अतिशय सुरेख आणि पारंपरिक लूक साकारून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
-
तिने मोरपंखी निळ्या आणि हिरव्या रंगाचा अत्यंत आकर्षक असा पारंपरिक लेहेंगा परिधान केला होता.
-
या लेहेंग्यावर भरतकाम (एम्ब्रॉयडरी) केलेली सुंदर निळी ओढणी आणि जरीचे काम असलेला घेरदार स्कर्ट दिसून येत आहे.
-
मोत्यांसह खड्यांचा वजनदार नेकलेस आणि कानांत वेशभूषेला शोभेसे झुमके घालून, तिने आपला लूक परिपूर्ण केला होता. घालून तिने आपला हा लूक परिपूर्ण केला होता.
-
केसांची लांब वेणी घालून, त्यात ताज्या लाल/गुलाबी फुलांची सजावट असलेली वेणी माळल्याने तिचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत होते.
-
तिचा हा मनमोहक आणि सोबर लूक गणेशोत्सवाच्या प्रसंगाला अगदी साजेसा आणि उठून दिसत होता.
-
जिनिलीयाच्या या पारंपरिक आणि ग्लॅमरस लूकचे फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य: जिनिलीया देशमुख/इन्स्टाग्राम)
रोज आंघोळ करणं ठीक, पण साबण रोज लावणं गरजेचं आहे का? त्वचारोगतज्ज्ञ काय सांगतात?