-
भारतीय क्रिकेटचा महान खेळाडू सचिन तेंडुलकरच्या घरी दरवर्षीप्रमाणे यंदाही लाडक्या बाप्पाचे मोठ्या उत्साहात आणि मंगलमय वातावरणात आगमन झाले आहे.
-
सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर हिने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून घरातील गणेशोत्सवाचे काही खास आणि सुंदर फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
-
शेअर केलेल्या फोटोत बाप्पाची मनमोहक आणि आकर्षक मूर्ती सुंदर अशा चांदीच्या मखरात विराजमान झाली आहे.
-
सारा तेंडुलकरने पारंपरिक गुलाबी रंगाचा भरतकाम केलेला ड्रेस परिधान केला असून कपाळावर लाल टिकली लावून ती अतिशय सुंदर दिसत आहे.
-
गणपती बाप्पाच्या आरतीदरम्यान सचिन तेंडुलकर स्वतः हातात आरतीचे ताट घेऊन बाप्पाची आरती करत आहे.
-
ताटात गरमागरम उकडीचा मोदक, वरणावर तूप घेतलेला भात आणि सुरेख पारंपरिक भाजीची मेजवानी दिसत आहे.
-
तेंडुलकर कुटुंबाने मोठ्या उत्साहाने, श्रद्धेने आणि पारंपरिक पद्धतीने आपल्या लाडक्या गजाननाचे स्वागत करून हा गणेशोत्सव साजरा केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: सारा तेंडुलकर/इन्स्टाग्राम)
ठाणे : शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याची निर्घृण हत्या