-
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्या घरी दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सवाचा मोठा उत्साह पाहायला मिळत असून बाप्पाचे आगमन झाले आहे.
-
घरातील बाप्पाच्या स्वागतासाठी तेंडुलकर कुटुंबाने विशेष तयारी केली असून अर्जुन तेंडुलकरची पत्नी सानिया चंडोक हिने देखील पारंपरिक लूक केला आहे.
-
गणेशोत्सवाच्या या खास प्रसंगासाठी सानियाने अत्यंत सुंदर आणि आकर्षक अशा गुलाबी रंगाची साडी नेसली आहे.
-
या पारंपरिक साडीवर सानियाने गळ्यात हिरव्या हिऱ्यांचा डिझाईन असलेला एक सुंदर कुंदन चोकर हार परिधान केला आहे.
-
कपाळावर साजेशी बिंदी आणि कानात मॅचिंग जुमके परिधान करून तिने आपला हा सणाचा लूक अधिकच सुंदर केला आहे.
-
हातात भरगच्च डिझाईनर बांगड्या आणि बोटात मोठी अंगठी घालून तिने आपला लूक पूर्ण केला आहे.
-
मोकळे सोडलेले केस, त्यावर लावलेली छोटी नाजूक फुले आणि हलका, नैसर्गिक मेकअप तिच्या सौंदर्यात भर घालत आहे.
-
चेहऱ्यावर हास्य आणि या अत्यंत देखण्या पारंपरिक अवतारातील सानियाचा हा लूक सोशल मीडियावर सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: सानिया चंडोक/इन्स्टाग्राम)
“आमच्या डोक्यात हाच विचार होता की…”, सिराजसह १० चेंडूत २६ धावांच्या भागीदारीदरम्यान नेमकी काय चर्चा झाली? अर्शदीपने स्वत: सांगितलं