-
मराठी अभिनेत्री श्रेया बुगडे हिच्या घरी बाप्पाचे आगमन झाले असून ती गणेशोत्सवाचा सण मोठ्या उत्साहाने साजरा करत आहे.
-
गणपती बाप्पाच्या आगमनानिमित्त आणि उत्सवाच्या या खास दिवसांमध्ये तिने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये तिने बाप्पासाठी तयार केलेल्या उकडीच्या मोदकांचा नैवेद्य आणि बाप्पाच्या सुंदर मूर्तीची झलक चाहत्यांना दाखवली आहे.
-
या खास प्रसंगी तिने तपकिरी रंगाची सुंदर डिझायनर साडी नेसली आहे, ज्याला लाल रंगाचा पारंपरिक काठ आणि अप्रतिम पदर आहे. साडीला साजेसा असा लाल रंगाचा ब्लाऊज घालून तिने हा लूक अधिकच आकर्षक बनवला आहे.
-
गळ्यात सोन्याची पोत आणि सुंदर हार, कानात मोठे सोन्याचे झुमके तसेच हातात घड्याळ आणि लाल-पिवळ्या बांगड्या असा तिचा पारंपरिक साज दिसत आहे.
-
श्रेयाने हे सुंदर फोटो पोस्ट करताना “तुझ्यासाठी नटण्याची मज्जाच काही वेगळी…” अशी सुंदर आणि भावूक कॅप्शन दिली आहे.
-
तिचे हे फोटो आणि ही खास कॅप्शन सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून चाहते तिच्या या लूकवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य: श्रेया बुगडे/इन्स्टाग्राम)
‘ज्ञानेश कुमार हे सर्वात मोठे देशद्रोही’, ४८ तासांत राजीनामा न दिल्यास देशव्यापी आंदोलन, सीजेपीच्या अभिजीत दिपकेंची घोषणा