-
मराठी अभिनेत्री वल्लरी विराज तिच्या उत्तम अभिनय आणि सुंदर फोटोशूटमुळे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते.
-
नुकतेच तिने सोशल मीडियावर आपले काही नवीन फोटो शेअर केले आहेत, जे सध्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.
-
या फोटोंमध्ये वल्लरीने सुंदर निळ्या रंगाची आईची काठपदराची साडी नेसली असून त्यात ती खूपच सुंदर दिसत आहे.
-
या साडीवर तिने गळ्यात सोन्याचा हार आणि कानात सुंदर झुमके परिधान करून आपला लूक पूर्ण केला आहे.
-
कपाळावर छोटीशी टिकली आणि मोकळ्या केसांमधील तिची आरशातील पोझ तिच्या सौंदर्यात अधिक भर घालत आहे.
-
हे फोटो पोस्ट करताना वल्लरीने ‘Nothing prettier than mom’s saree!’ अशी कॅप्शन दिली आहे.
-
आईची साडी नेसून केलेल्या या लूकवर तिच्या चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा मोठा वर्षाव होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: वल्लरी विराज/इन्स्टाग्राम)
संक्या सुपरस्टार झालास यार! ‘आदि अनंत’ पाहून भावुक झाली मराठी अभिनेत्री! संकर्षणला म्हणाली, “तुझ्या कविता, लिखाण…”