-
नृत्यांगना गौतमी पाटील हिने लालबागचा राजा, मुंबईचा राजा, परळचा महाराजा आणि मुंबईतील इतर गणपतींचे मनःपूर्वक दर्शन घेतले.
-
दर्शन सोहळ्यादरम्यान तिने पारंपरिक गुलाबी रंगाची सुंदर साडी परिधान केली होती, ज्यामध्ये तिचा अतिशय सात्विक आणि मोहक अंदाज पाहायला मिळाला.
-
लालबागचा राजा आणि इतर प्रमुख गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी गौतमीचे शाल, नारळ व पुष्पगुच्छ देऊन आदरातिथ्य आणि सत्कार केला.
-
विविध देखाव्यांच्या आणि भव्य गणेश मूर्तींच्या मंडपात गौतमीने अत्यंत श्रद्धेने हात जोडून बाप्पाचे दर्शन घेत प्रार्थना केली.
-
विविध मंडळांच्या गणेशोत्सव सोहळ्यात तिचे आगमन होताच तेथील कार्यकर्त्यांमध्ये आणि चाहत्यांमध्ये मोठा उत्साह दिसून आला.
-
हे सर्व फोटो शेअर करत गौतमीने या पोस्टला “सहा गणपती, एकच भावना — बाप्पा, तुझं दर्शन झालं आणि मन भरून आलं!” अशी कॅप्शन दिली आहे
-
तिच्या या मुंबई गणेश दर्शन दौऱ्याचे अनेक फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून चाहत्यांकडून त्याचे कौतुक होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: गौतमी पाटील/इन्स्टाग्राम)
१५ व्या वर्षी सुपरस्टार, मुली रक्ताने पत्रे लिहायच्या; पण ‘त्या’ एका गोष्टीमुळे करिअर उद्ध्वस्त झालं, आज कुठेय करिश्मा कपूरचा हिरो?