-
झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मधील अभिनेत्री पूर्णिमा डे हिने गणेशोत्सवाच्या निमित्ताने खास फोटोशूट केले आहे.
-
या खास फोटोशूटसाठी तिने जांभळ्या रंगाची सुंदर नऊवारी साडी आणि त्यावर नारंगी रंगाचा ब्लाऊज परिधान केला आहे.
-
पूर्णिमाने परिधान केलेल्या नऊवारी साडीला लाल आणि सोनेरी रंगाची आकर्षक काठ-पदराची किनार असल्याचे दिसते.
-
पारंपरिक लूक परिपूर्ण करण्यासाठी तिने गळ्यात सोन्याचा चोकर हार आणि मोठा लांब हार घातला आहे.
-
कानात सुंदर झुमके, नाकात पारंपरिक नथ आणि हातात हिरव्या बांगड्यांचा चुडा तिच्या सौंदर्यात भर घालत आहे.
-
हे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर करीत तिने ‘Tradition looks good on me no?’ अशी कॅप्शन दिली आहे.
-
पूर्णिमाच्या या मनमोहक आणि अस्सल मराठमोळ्या लूकवर चाहते आणि नेटकऱ्यांकडून लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: पूर्णिमा डे/इन्स्टाग्राम)
तुम्हाला शौचासाठी किती वेळ लागतो? मलविसर्जनाच्या या एका सवयीवरून कळेल तुमची पचनसंस्था किती निरोगी!