-
‘कमळी’ मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री विजया बाबर हिच्या घरी यंदा गौरी-गणपतीचे अत्यंत उत्साहात आगमन झाले आहे.
-
विजयाने तिच्या घरातील गौरी-गणपतीच्या पूजेचे आणि इतर सुंदर फोटो सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
-
सणांच्या या विशेष प्रसंगी विजयाने मरून रंगाची नऊवारी साडी परिधान करून, अत्यंत आकर्षक असा पारंपरिक लूक साकारला आहे.
-
तिच्या साडीला चंदेरी किनार असून, तिने घातलेल्या नक्षीदार ब्लाऊजच्या पाठी देवीची सुरेख प्रतिमा पाहायला मिळत आहे.
-
गळ्यात मोत्याचा ठुशी हार, नाकात नथ आणि हातात हिरव्या-गुलाबी बांगड्यांमुळे तिचा हा सणानिमित्तचा लूक अधिकच खुलून दिसतोय.
-
गौरींच्या मूर्तींना जांभळ्या आणि पिवळ्या रंगाच्या रेशमी साड्या व पारंपरिक दागिने नेसवून, अत्यंत आकर्षक पद्धतीने सजवले आहे.
-
हे सुंदर फोटो शेअर करताना तिने ‘सण, परंपरा आणि खूप सारा आनंद’ अशी कॅप्शन दिली आहे.
-
बाप्पा आणि गौरींच्या चरणी मनोभावे पूजा करताना विजया अत्यंत आनंदी दिसत असून, तिचे हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस पडत आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य: विजया बाबर/इन्स्टाग्राम)
Indian Express Exclusive: साताऱ्यात ‘अदाणी’नं प्रकल्पखर्च ९९ टक्क्यांनी कमी दाखवून शासकीय भरणा २२७ कोटींऐवजी फक्त २.२७ कोटी केला, कागदोपत्री पुरावे समोर; चौकशीचे आदेश!