-
गणेशोत्सवाच्या पावन पर्वावर अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने तिच्या घरी गणपती बाप्पाची अतिशय भक्तिभावाने आणि थाटामाटात स्थापना केली आहे.
-
अपूर्वाने निळ्या रंगाची नऊवारी साडी आणि पारंपरिक दागिने परिधान करून अत्यंत सुंदर व देखणा लूक साकारला आहे.
-
या खास सोहळ्यासाठी अपूर्वाने नाकात नथ, गळ्यात पारंपरिक सोन्याचे हार आणि हातात हिरव्या बांगड्यांचा चुडा भरून आपला अस्सल मराठमोळा साज पूर्ण केला आहे.
-
अभिनेत्री सुप्रिया पाठारे यांनी अपूर्वाच्या घरी जाऊन बाप्पाचे दर्शन घेतले असून दोघांचे एकत्र फोटो सोशल मीडियावर चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.
-
या फोटो शेअर करताना अपूर्वाने ‘मोदक, नाच, गाणी आणि न संपणाऱ्या गप्पा!’ अशी खास कॅप्शन दिली आहे.
-
घरातील गणपती बाप्पाच्या मूर्तीसोबत अपूर्वाने कौटुंबिक वातावरणात आणि मित्र-परिवारासोबत अतिशय आनंदाने विविध पोजमध्ये फोटो काढले आहेत.
-
सोशल मीडियावर अपूर्वाच्या या पारंपरिक लूकचे आणि घरातील गणेशोत्सवाच्या फोटोंचे चाहते भरभरून कौतुक करत आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्: अपूर्वा नेमळेकर/इन्स्टाग्राम)
Video: “गोकुळ चांगली संस्था आहे, पण ती इतकीही मोठी नाही की…” देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं संचालकांच्या नेमणुकीमागचं कारण