-
बॉलीवूडचे लोकप्रिय जोडपे आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांनी यंदाचा गणेशोत्सव अत्यंत भक्तिभावाने आणि थाटामाटात साजरा केला आहे.
-
कपूर कुटुंबाने त्यांच्या घरी गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना असून, नीतू कपूर, आलिया, रणबीर आणि त्यांची चिमुकली मुलगी राहा एकत्र पूजा करताना दिसून आले.
-
आलिया भट्टने या खास क्षणांचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले असून, त्यामध्ये संपूर्ण कुटुंबाची झलक पाहायला मिळत आहे.
-
पूजा करताना आलिया भट्टने गुलाबी रंगाचा पारंपरिक पोशाख परिधान केला होता, ज्यामध्ये ती अत्यंत सुंदर दिसत होती.
-
तिने हातावर सुंदर ओढणी, कानांत पारंपरिक झुमके आणि केसांची आकर्षक हेअरस्टाईल करून आपला लूक पूर्ण केला होता.
-
दुसऱ्या एका फोटोत आलियाने पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला असून, हातात आरतीचे ताट धरून ती बाप्पाची आरती करताना दिसते.
-
लहानगी राहादेखील गुलाबी रंगाच्या सुटमध्ये अत्यंत गोंडस दिसत होती आणि ती हात जोडून बाप्पाचे दर्शन घेताना दिसून आली.
-
गणपती बाप्पाची मूर्ती पिवळ्या फुलांनी, दिव्यांच्या रोषणाईने आणि चांदीच्या मखराने अत्यंत आकर्षकरीत्या सजवण्यात आली होती.
-
(सर्व फोटो सौजन्: आलिया भट्ट/इन्स्टाग्राम)
शरद पवार आमच्यासोबत आले असते, तर ते राष्ट्रपती झाले असते; केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात सुप्रिया सुळे यांना संधी मिळू शकते – रामदास आठवले