-
स्टार प्रवाहवरील ‘लपंडाव’ मालिकेतील तेजस्विनी कामत म्हणजेच लोकप्रिय अभिनेत्री रुपाली भोसले सध्या खूप चर्चेत आली आहे.
-
अभिनेत्री रुपाली भोसले हिने गणेशोत्सवाचे औचित्य साधून पारंपरिक नऊवारी साडीमध्ये अत्यंत सुंदर फोटोशूट केले आहे.
-
या खास फोटोशूटसाठी रूपालीने लाल-सोनेरी काठ असलेली जांभळ्या रंगाची नऊवारी साडी नेसली आहे.
-
तिने गळ्यात पारंपरिक मोत्याचे दागिने, कानात झुमके आणि नाकात मोत्याची नथ परिधान केली आहे.
-
हातात लाल-काळ्या बांगड्यांचा चुडा, पायात घुंगरांचे तोडे आणि कोल्हापुरी चप्पल घालून लूक पूर्ण केला आहे.
-
सोशल मीडियावर हे सुंदर फोटो शेअर करताना तिने ‘नऊवारी म्हणजे स्वाभिमान…!’ अशी कॅप्शन दिली आहे.
-
सोशल मीडियावर तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सच्या माध्यमातून प्रचंड कौतुकाचा वर्षाव होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्: रुपाली भोसले/इन्स्टाग्राम)
प्रफुल पटेलांनी घेतली शरद पवारांची भेट, पवार म्हणाले; “आपण १० तारखेनंतर एकत्र बसू”