-
अभिनेत्री व मॉडेल आयेशा खान तिच्या खास आणि आकर्षक स्टाईलमुळे नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते.
-
गणेशोत्सवाच्या या खास प्रसंगी तिने पारंपरिक आणि अत्यंत सुंदर लूक करून चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.
-
तिने परिधान केलेली सोनेरी रंगाची सिल्क साडी आणि त्यावर लाल एम्ब्रॉयडरी बॉर्डर तिच्या सौंदर्याला शोभा आणते.
-
या साडीसोबत तिने हेवी वर्क असलेला मखमली लाल रंगाचा ब्लाऊज परिधान केला आहे.
-
पारंपरिक दागिन्यांमध्ये तिने नाकात मोत्याची नथ घालून, आपला मराठमोळा आणि आकर्षक लूक पूर्ण केला आहे.
-
कानातील झुमके, हातातील लाल बांगड्या आणि नाजूक चंद्रकोर टिकली तिच्या या लूकला अधिक खुलवत आहे.
-
फोटोंना तिने ‘पदरात चांदणं, नजरेत स्वप्नं’ अशी अतिशय सुंदर आणि अर्थपूर्ण कॅप्शन दिली आहे.
-
आयेशाचा हा सणानिमित्तचा खास लूक सध्या तिच्या चाहत्यांच्या पसंतीस पडत असून, फोटो तुफान व्हायरल होत आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्: आयेशा खान/इन्स्टाग्राम)
Video: “गोकुळ चांगली संस्था आहे, पण ती इतकीही मोठी नाही की…” देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं संचालकांच्या नेमणुकीमागचं कारण