-
मुंबईमध्ये अनंत चतुर्दशीच्या दिवशी लालबाग आणि चिंचपोकळी परिसरात गणपती विसर्जन मिरवणुका अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात सुरू झाल्या आहेत. (फोटो सौजन्य :आकाश पाटील )
-
राजा तेजुकाया आणि लालबागचा राजा यांसारख्या बाप्पांना निरोप देण्यासाठी हजारो भाविकांचा अलोट जनसागर रस्त्यावर उतरला आहे. (फोटो सौजन्य :आकाश पाटील )
-
राजा तेजुकायाच्या विसर्जन मिरवणुकीतील गणेशाची भव्य आणि रुबाबदार मूर्ती सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. (फोटो सौजन्य :आकाश पाटील )
-
मिरवणुकीत ठिकठिकाणी उधळलेला गुलाल, डीजेचा गजर आणि रंगीबेरंगी धुराचे फवारे यांमुळे वातावरण अत्यंत नयनरम्य झाले आहे. (फोटो सौजन्य :आकाश पाटील )
-
विविध गणेश मंडळांच्या मूर्तींवर फुलांची वृष्टी करत आणि पाण्याचे फवारे उडवत भक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाला भावूक निरोप दिला. (फोटो सौजन्य :आकाश पाटील )
-
मिरवणुकीत नंदीवर विराजमान झालेली गणेशाची अद्भूत आणि भव्य मूर्ती सर्व भाविकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे. (फोटो सौजन्य :गणेश शिर्सेकर )
-
चिंचपोकळी पुलाजवळ जमलेल्या गर्दीने बाप्पाच्या या अंतिम दर्शनाचे क्षण आपापल्या मोबाईलमध्ये टिपण्यासाठी एकच गर्दी केली होती. (फोटो सौजन्य :आकाश पाटील )
-
पारंपरिक वाद्यांच्या आणि ढोल-ताशांच्या तालावर तरुण-तरुणींनी आणि ज्येष्ठ नागरिकांनी एकत्र येत मिरवणुकीचा आनंद लुटला. (फोटो सौजन्य :आकाश पाटील )
-
गिरगाव चौपाटीच्या दिशेने जाणाऱ्या मुख्य विसर्जन मार्गांवर भाविकांच्या स्वागतासाठी भव्य बॅनर आणि पुष्पवृष्टीची व्यवस्था करण्यात आली आहे. (फोटो सौजन्य :आकाश पाटील )
राज ठाकरेंच्या नातीचे थाटात नामकरण; अमित ठाकरेंनी कन्येचे ठेवले ‘हे’ ऐतिहासिक नाव