OnePlus 8 आणि OnePlus 8 Pro लॉन्च: जाणून घ्या भन्नाट फिचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि किंमत
- 1 / 25
स्मार्टफोन निर्माती कंपनी वन प्लस कंपनीने आज OnePlus 8 आणि OnePlus 8 Pro हे दोन फोन लॉन्च केले. या दोन्ही या इव्हेंटमध्ये कंपनी आपले बहुप्रतीक्षित फोनबद्दल टेक जगतामध्ये मागील अनेक महिन्यांपासून चर्चा होती. अपेक्षेप्रमाणे या फोनमध्ये अद्यावत फिचर्स देण्यात आले आहेत चला तर मग जाणून घेऊयात. काय आहेत या फोनचे फिचर्स आणि किती आहे किंमत... (सर्व फोटो: वन प्लस एट ट्विटर)
- 2 / 25
OnePlus 8 आणि OnePlus 8 Pro हे दोन्ही फाइव्ह जी तंत्रज्ञान असणारे फोन असणार आहे.
- 3 / 25
OnePlus 8 आणि OnePlus 8 Pro हे फोन ऑक्सी ब्लॅक, अल्ट्रामरीन ब्लू आणि ग्लॅसीयल ग्रीन रंगांमध्ये उपलब्ध होणार आहे.
- 4 / 25
मोबाईलमध्ये स्नॅपड्रॅगन ८६५ प्रोसेसर आहे.
- 5 / 25
फोनमध्ये USB 3.1, WiFi 6 ची सुविधा देण्यात आली आहे.
- 6 / 25
याशिवाय फोनला 4,300mAh ची बॅटरी आहे.
- 7 / 25
फोनमध्ये वायरलेस चार्जिंगची सुविधा देण्यात आली आहे.
- 8 / 25
30 Watt Wireless Warp Charger ने हा फोन चार्ज होईल.
- 9 / 25
फोनला ड्युएस स्टेरीओ स्पीकर्स आहेत.
- 10 / 25
फोनमध्ये मायक्रो लेन्स आणि हॅप्टीक व्हाब्रेशन २.० सारखे फिचर्सही या फोनमध्ये आहेत.
- 11 / 25
मोबाईलमध्ये ४८ मेगापिक्सलचा कॅमेरा असून त्यामध्ये सोनीने बनवलेले खास सेन्सर्स असणार आहे. या कॅमेरामध्ये १२० डिग्रीचा फिल्ड व्ह्यू कॅप्चर करण्याची क्षमता आहे. ५ मेगापिक्सलचा फ्रण्ट कॅमेरा आहे.
- 12 / 25
फोनमधील कॅमेरात टेली फोटोलेन्स असून या लेन्सची क्षणता 3X lossless आणि 30X Digital Zoom इतकी आहे. तसेच कॅमेरामध्ये कलर फिल्टरही देण्यात आले आहे.
- 13 / 25
पहिल्यांदाच वन प्लसने थ्री कॅमेरा सेटअप दिला आहेत.
- 14 / 25
६.७८ इंचाची Amoled स्क्रीन असून तिचे रेझोल्यूशन 3168*1440 इतके आहे.
- 15 / 25
दिवसभरामध्ये आपण २०० पेक्षा अधिक वेळा फोन उचलतो. त्यामुळे आम्ही रंग, वापरण्यात आलेले मटेरियल आणि डिझायनिंगचा विचार करुन हा फोन बनवला आहे असं कंपनीने म्हटलं आहे.
- 16 / 25
स्क्रीनच्या आकारानुसार हा फोन आयफोनपेक्षाही मोठा आहे.
- 17 / 25
हा फोन अॅड्रॉइड १० वर काम करेल.
- 18 / 25
मागील अनेक महिन्यांपासून या फोनच्या लॉन्चिंगची चर्चा सुरु होती. मात्र अखेर हा फोन आज लॉन्च केला आहे.
- 19 / 25
वन प्लस ७ आणि ७ प्रोमधील पॉप अप सेल्फी कॅमेराऐवजी या फोनमध्ये punch-hole notch देण्यात आला आहे.
- 20 / 25
हा फोन डस्ट आणि वॉटर रेझिटन्ट आहे. यासाठी त्याला IP ६८ मानांकन प्राप्त झाले आहे.
- 21 / 25
युरोपीयन बाजारपेठेमध्ये २१ एप्रिलपासून या फोनची विक्री सुरु होणार आहे.
- 22 / 25
भारतामध्ये हा फोन कधी विक्रीला येणार यासंदर्भात कंपनीने कोणतीही माहिती आजच्या इव्हेंटमध्ये दिलेली नाही. मात्र या फोनच्या किंमती कंपनीने जाहीर केल्या आहेत.
- 23 / 25
वन प्लस ८ च्या ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी व्हेरिएंटची (गॅलियल ग्रीन) किंमत ६९९ डॉलर (७६ रुपये डॉलरच्या दराने ५३ हजार १०० रुपये) असून १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी व्हेरिएंटची किंमत ७९९ डॉलर (६० हजार ७०० रुपये) इतकी आहे.
- 24 / 25
तर वन प्लस ८ प्रोच्या ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी व्हेरिएंटची किंमत ८९९ डॉलर (६८ हजार ३०० रुपये) आहेत. तर १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी व्हेरिएंटची किंमत ८९९ डॉलर (७५ हजार ९०० रुपये) इतकी आहे.
- 25 / 25
कपंनीने बुलेट वायरलेस झे नावाचे हेडफोन्सही लॉन्च केले असून त्यांची किंमत ४९.९५ डॉलर (३ हजार ८०० रुपये) आहे.