Seltos वर मात करत ठरली ‘बेस्ट सेलिंग SUV’, बुकिंगची ‘डिमांड’ वाढली; किंमत…
- 1 / 15
लॉकडाउनमध्ये ऑटो क्षेत्रातील जवळपास सर्वच कंपन्यांच्या गाड्यांच्या विक्रीवर परिणाम झाल्याचं समोर आलं आहे.
- 2 / 15
पण, Hyundai कंपनीच्या नवीन Creta या एसयूव्हीची डिमांड मात्र लॉकडाउनमध्येही कायम असल्याचं दिसतंय.
- 3 / 15
2020 Hyundai Creta ची चांगलीच क्रेझ असून जून महिन्यात ही गाडी अन्य स्पर्धक कंपन्यांवर मात करत एसयूव्ही सेगमेंटमधील सर्वाधिक विक्री होणारी कार ठरली आहे.
- 4 / 15
याशिवाय, जुलै महिन्याच्या पहिल्या 14 दिवसांमध्येच या एसयूव्हीसाठी पाच हजारांहून अधिक जणांनी बुकिंग केल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे.
- 5 / 15
बहुतांश ग्राहकांचा नवीन क्रेटाच्या डिझेल मॉडेल आणि ह्युंडाई ब्लू-लिंक फीचर असलेले मॉडेल खरेदी करण्याकडे कल असल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं.
- 6 / 15
कंपनीने ऑटो एक्स्पो 2020 मध्ये नवीन जनरेशन क्रेटा लाँच केली होती. त्यानंतर 16 मार्चपासून या गाडीसाठी कंपनीने बुकिंग घ्यायला सुरूवात केली, आणि तेव्हापासून आतापर्यंत एकूण बुकिंगचा आकडा 45 हजारांच्याही वर गेला आहे.
- 7 / 15
2020 Hyundai Creta ही एसयूव्ही E, EX, S, SX आणि SX(O) अशा पाच व्हेरिअंट्समध्ये भारतीय बाजारात आली आहे.
- 8 / 15
नव्या BS-6 इंजिनमुळे कारची इंधन कार्यक्षमता वाढणार आहे, त्यामुळे ही SUV आधीपेक्षा अधिक मायलेज देते असा कंपनीचा दावा आहे.
- 9 / 15
स्टँडर्ड फीचर्स - प्रोजेक्टर हेडलँप्स, ब्लॅक रेडिएटर ग्रिल, ड्युअल-टोन बंपर, सिल्व्हर B-C पिलर गार्निश, 3.5 इंच मोनो टीएफटी मल्टी इन्फॉर्मेशन डिस्प्ले, D-कट स्टिअरिंग विथ टिल्ट अॅड्जस्टमेंट, हाइट अॅड्जस्टेबल ड्रायव्हर सीट, रिमोट लॉकिंग, रिअर एसी व्हेंट्स यांसारखे स्टँडर्ड फीचर्स नव्या क्रेटामध्ये देण्यात आलेत.
- 10 / 15
याशिवाय, पॉवर अॅड्जस्टेबल ORVMs, लेन चेंज इंडिकेटर, ड्युअल फ्रंट एअरबॅग्स, ABS विथ EBD, सीट बेल्ट रिमाइंडर, रिअर पार्किंग सेंसर्स, स्पीड सेंसिंग डुअर लॉक्स आणि हाय स्पीड अलर्ट यांसारखे स्टँडर्ड फीचर्स आहेत.
- 11 / 15
तसेच, 17 इंच डायमंड कट अॅलॉय व्हिल्स , 8-स्पीकर बोस साउंड सिस्टिम, 7 इंच इंस्ट्रूमेंट क्लस्टर, फ्रंट व्हेंटिलेटेड सीट, रिमोट इंजिन स्टार्ट-स्टॉप, ऑटो होल्ड फंक्शन असलेले इलेक्ट्रिक पार्किंग ब्रेक आणि 6 एअरबॅग्स यांसारखे फीचर्स टॉप अँड SX(O) मॉडेलमध्ये मिळतील.
- 12 / 15
ही एसयूव्ही इंजिनच्या तीन पर्यायांसह - 1.5L पेट्रोल, 1.5L डिझेल आणि 1.4L टर्बो पेट्रोल इंजिनमध्ये उपलब्ध आहे.
- 13 / 15
हे तिन्ही इंजिन अनुक्रमे 115PS ची पॉवर व 144Nm टॉर्क, 115PS ची पॉवर व 250Nm टॉर्क, आणि 140PS ची पॉवर व 242Nm टॉर्क जनरेट करतात.
- 14 / 15
6-स्पीड मॅन्युअल, 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक आणि 7-स्पीड ड्युअल क्लच ऑटोमॅटिक गिअरबॉक्सच्या पर्यायासह क्रेटा उपलब्ध आहे.
- 15 / 15
क्रेटाच्या 1.5L पेट्रोल आणि डिझेल व्हेरिअंट्समध्ये 16.8kmpl चा मायलेज मिळेल. गेल्या वर्षी भारतीय मार्केटमध्ये लाँच झाल्यापासून एसयूव्ही सेगमेंटमध्ये किया मोटर्सच्या सेल्टॉसचा दबदबा होता. पण आता सेल्टॉसवर मात करत क्रेटा जून महिन्यातील बेस्ट सेलिंग एसयूव्ही ठरली आहे. जूनमध्ये क्रेटाच्या 7,207 गाड्यांची विक्री झाली, तर सेल्टॉसच्या 7,114 गाड्यांची विक्री झाली आहे. क्रेटाच्या तुलनेत Kia Seltos 1.5L पेट्रोल आणि डिझेल व्हेरिअंट्समध्ये 16.5kmpl मायलेज देते. 2020 Hyundai Creta या SUVच्या बेसिक मॉडेलची एक्स-शोरुम किंमत 9.99 लाख रुपये, तर टॉप मॉडेलची किंमत 17.2 लाख रुपये आहे. (सर्व फोटो क्रेडिट - hyundai.com)