मारुतीची बहुप्रतिक्षित SUV ! लाँचिंगआधीच 11 हजारांत बूकिंगला झाली सुरूवात
- 1 / 15
देशातील सर्वात मोठी कार कंपनी Maruti Suzuki ने आपली लोकप्रिय क्रॉसओव्हर एसयूव्ही Maruti S-Cross नवीन BS6 पेट्रोल मॉडेलमध्ये लाँच करण्याची तयारी पूर्ण केली आहे. BS-6 पेट्रोल मॉडेलमधील एस-क्रॉस या वर्षीच्या बहुप्रतिक्षित गाड्यांपैकी एक आहे.
- 2 / 15
लाँचिंगआधीच मारुती सुझुकीने नवीन S-Cross साठी बूकिंग घ्यायलाही सुरूवात केली आहे. 11 हजार रुपयांमध्ये या एसयूव्हीच्या बूकिंगसाठी कंपनीने सुरूवात केली आहे.
- 3 / 15
फेब्रुवारी महिन्यात झालेल्या ऑटो एक्स्पोमध्ये कंपनीकडून पहिल्यांदा पेट्रोल मॉडेलमधील एस-क्रॉसची झलक दाखवण्यात आली होती.
- 4 / 15
आधी ही एसयूव्ही फक्त डिझेल इंजिनमध्ये यायची, तर आता ही गाडी केवळ पेट्रोल इंजिनमध्येच उपलब्ध असणार आहे.
- 5 / 15
ही एसयूव्ही कंपनी एप्रिलमध्ये लाँच करणार होती, पण करोना संकटामुळे लाँचिंग पुढे ढकलण्यात आलं. त्यानंतर आता ही गाडी पाच ऑगस्ट रोजी लाँच होणार आहे.
- 6 / 15
अपडेटेड एस-क्रॉसमध्ये बीएस-6 मानकांसह 1.5-लिटर पेट्रोल इंजिन मिळेल. हेच इंजिन सब-कॉम्पॅक्ट एसयूव्ही ब्रिझामध्येही देण्यात आलं आहे.
- 7 / 15
हे इंजिन 103bhp ची पॉवर आणि 138Nm टॉर्क निर्माण करतं. यासोबत 5-स्पीड मॅन्युअल आणि 4-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचे पर्याय असतील. ऑटोमॅटिक व्हर्जनमध्ये या इंजिनसह सुझुकीची माइल्ड-हाइब्रिड सिस्टिमही मिळेल. बीएस-4 व्हर्जन एस-क्रॉसमध्ये 1.3-लिटर डिझेल इंजिन होतं, त्याला आता 1.5-लिटर पेट्रोल इंजिनने रिप्लेस करण्यात आलं आहे.
- 8 / 15
बीएस-6 मारुती एस-क्रॉस चार व्हेरिअंटमध्ये - (Sigma, Delta, Zeta आणि Alpha) येईल.
- 9 / 15
यात Sigma व्हेरिअंटमध्ये ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा पर्याय नसेल, पण अन्य तिन्ही व्हेरिअंटमध्ये हा पर्याय मिळेल.
- 10 / 15
आधीप्रमाणेच एस-क्रॉस पाच कलरच्या पर्यायांमध्ये (नेक्सा ब्लू, पर्ल आर्क्टिक व्हाइट, प्रीमियम सिल्वर, ग्रेनाइट ग्रे आणि कॅफीन ब्राउन) येईल.
- 11 / 15
अपडेटेड मारुती एस-क्रॉसच्या टॉप व्हेरिअंटमध्ये शानदार फीचर्स मिळतील. यात एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्प, एलईडी डीआरएल, एलईडी टेललॅम्प, ऑटो हेडलॅम्प लेवलिंग आणि ऑटोमॅटिक हेडलॅम्प, सिल्वर रूफ रेल्स, रेन सेन्सिंग वाइपर्स, लेदर सीट, लेदर डुअर आर्मरेस्ट, लेदर स्टीअरिंग व्हील आणि ऑटो डिमिंग इनसाइड रिअर व्ह्यू मिरर यांसारख्ये फीचर्सचा समावेश आहे.
- 12 / 15
या क्रॉस-ओव्हर एसयूव्हीची टक्कर किया सेल्टॉस, ह्युंडाई क्रेटा, निसान किक्स आणि रेनॉ डस्टर या गाड्यांशी असेल.
- 13 / 15
सुरक्षेसाठी या क्रॉसओवर एसयूव्हीमध्ये ड्युअल फ्रंट एअरबॅग्स, Isofix चाइल्ड सीट माउंट्स, EBD आणि ABS, Nexa सेफ्टी शील्ड आणि स्पीड सेन्सिंग डुअर लॉक यांसारखे स्टँडर्ड फीचर्स असतील.
- 14 / 15
ग्राहक 'नेक्सा'च्या डिलरशिपमधून किंवा नेक्साच्या वेबसाइटवरुन या एसयूव्हीसाठी बूकिंग करु शकतात.
- 15 / 15
एस-क्रॉसच्या पेट्रोल मॉडेलची किंमत आधीच्या डिझेल मॉडेलपेक्षा कमी असण्याची शक्यता आहे. एस-क्रॉस डिझेलची एक्स-शोरुम किंमत 8.81 लाख ते 11.44 लाख रुपयांदरम्यान होती. तर, 5 ऑगस्ट रोजी लाँच होणाऱ्या पेट्रोल मॉडेल एस-क्रॉसची एक्स-शोरुम किंमत 7.5 लाख ते 12 लाख रुपयांदरम्यान असण्याची शक्यता आहे. (सर्व फोटो सौजन्य : nexaexperience.com वेबसाइट आणि व्हिडिओवरुन घेतलेले स्क्रीनशॉट)