फ्रिज, एसी, वॉशिंग मशीनवर ५० टक्क्यांपर्यंत सूट; Amazon चा Monsoon Appliance सेल सुरु
- 1 / 15
ई-कॉमर्स वेबसाइट अॅमेझॉन इंडियाने गणेश चतुर्थीच्या दिवशीच 'मान्सून अप्लायन्सेस स्टोअर' सेलची घोषणा केली आहे. या सेलमध्ये घरात वापरल्या जाणाऱ्या मोठ्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंबरोबरच होम आणि किचन अप्लायन्सेसवर मोठी सूट देण्यात आली आहे.
- 2 / 15
ग्राहकांना २४ ऑगस्टपर्यंत या सेलमध्ये ५० टक्क्यांपर्यंत सूट मिळणार आहे. सॅमसंग, एलजी, वर्लपूल, बॉश, विप्रो, न्यासा, यूरेका फोर्ब्स, बजाज यासारख्या अनेक मोठ्या ब्रॅण्डच्या प्रोडक्टवर या सेलमध्ये सूट देण्यात आली आहे.
- 3 / 15
अॅमेझॉनच्या या 'मान्सून अप्लायन्सेस स्टोअर'मध्ये शेड्यूल डिलेव्हरी, एक्सचेंज ऑफर्स, नो कॉस्ट इइमआय, इंन्स्टॉलेशन आणि इतर अनेक सुविधा मोफत देण्यात आल्या आहेत.
- 4 / 15
बँक ऑफ बडोदाच्या क्रेडीट कार्डने केलेल्या इएमआय ट्रान्सझॅक्शनवर पाच टक्के अतिरिक्त सूट देण्यात येणार आहे. मात्र ही सूट मिळवण्यासाठी किमान ८ हजारांची खरेदी करावी लागेल.
- 5 / 15
त्याचप्रमाणे फेड्रल डेबिट कार्डने केलेल्या इएमआय ट्रान्सझॅक्शनवर पाच हजारांची खरेदी केल्यावर दीड हजारांची सूट देण्यात येत आहे.
- 6 / 15
वोल्टास, डैकिन, एलजी, गोदरेज, सान्यो आणि इतर कंपनीच्या एसीवर ४० टक्क्यांपर्यंतची सूट आहे.
- 7 / 15
स्पिलिट एसीच्या किंमत अगदी २२ हजार ४९९ पासून सुरु होत आहेत. तर विंडो एसी १७ हजार ४९९ पासून उपलब्ध आहेत.
- 8 / 15
फ्रण्ट लोड, टॉप लोड आणि सेमी ऑटोमॅटीक वॉशिंग मशीन्सवर ३५ टक्क्यांपर्यंत सूट देण्यात आली आहे.
- 9 / 15
एलजी, वर्लपूल, सॅमसंग, आयएफबी, बोश आणि इतर कंपन्यांच्या वॉशिंग मशीनची किंमत अगदी १० हजारांपासून सुरु होत आहे.
- 10 / 15
एलजी, वर्लपूल, सॅमसंग, हायर आणि गोदरेजसारख्या टॉप ब्रॅण्डचे फ्रीज ३५ टक्के सवलतीच्या दरात विकण्यात येत आहे.
- 11 / 15
फ्रीजच्या किंमती अगदी १२ हजार ७९० रुपयांपासून सुरु होत आहेत. तर बाय साइड रेफ्रिजरेटरवर एक्सेंज ऑफरमध्ये १२ हजारांपर्यंतची सूट देण्यात येत आहे.
- 12 / 15
किचन आणि होम अपलायन्सेसवरही ५० टक्क्यांपर्यंत सूट देण्यात आली आहे.
- 13 / 15
वॉटर प्युरिफायर अगदी १६९९ रुपयांच्या रेंजपासून उपलब्ध आहेत.
- 14 / 15
याचबरोबर किचनमध्ये वापरता येणाऱ्या मिक्सर, हॅण्ड ग्राइण्डरसारख्या गोष्टींवरही ५० टक्क्यांपर्यंत सूट देण्यात आली आहे.
- 15 / 15
इस्त्री, गिझर आणि इतर इलेक्ट्रीक वस्तूंवरही मोठ्या प्रमाणात सूट देण्यात आली आहे. ही सवलत दोन दिवस म्हणजेच २४ ऑगस्टपर्यंत उपलब्ध असणार आहे.