
YouTube ने आता एक नवं फिचर लाँच केलं आहे. या फिचरचं नाव Super Thanks असं ठेवण्यात आलं असून या फिचरमुळे क्रिएटर्सना पैसे कमविण्याची नवी संधी उपलब्ध होईल. (Photo : Indian Express)
आतापर्यंत एकूण ६८ देशांमधील डेस्कटॉप आणि मोबाईलवर क्रिएटर्स आणि व्ह्यूअर्ससाठी हे फिचर उपलब्ध आहे. तसेच Android आणि IOS या दोन्हीकडेही उपलब्ध आहे. (Photo : Indian Express)
२०२१ च्या अखेरपर्यंत आणखी जास्त क्रिएटर्सपर्यंत हे फिचर पोहोचण्याचा आपला प्रयत्न असल्याचं कंपनीने म्हटले आहे. (Photo : Reuters)
युट्युबने याबाबत असं सांगितले आहे कि, हे नवं फिचर प्रायव्हेट, एज रेस्ट्रिक्शन आणि अनलिस्टेड अशा काही प्रकारच्या व्हिडिओजसाठी उपलब्ध नसेल.
सुपर चॅट आणि सुपर स्टिकर्सप्रमाणेच सुपर थँक्समार्फत फिचर कंटेंट क्रिएटर्सना आपल्या चाहत्यांशी कनेक्ट होण्यासोबतच अधिक पैसे कमवण्याची संधी मिळणार आहे. (Photo : Indian Express)
सुपर थँक्सचा अॅक्सेस मिळाला कि नाही? हे देखील तुम्ही तपासू शकता. सर्वप्रथम, YouTube क्रिएटर स्टुडिओमध्ये साईन इन करा आणि डाव्या बाजूच्या मेन्यूमध्ये मॉनेटायझेशनवर क्लिक करा. (Photo : Indian Express)
पुढे सुपर टॅबवर क्लिक करा. त्याठिकाणी तुम्हाला सुपर थँक्ससह ऑन आणि ऑफचा पर्याय दिसेल. अद्याप हा पर्याय दिसत नसेल तर तुम्हाला काही दिवस या फीचरची वाट पाहावी लागेल. (Photo : Reuters)