
मधुमेहाच्या रुग्णांमध्ये आहार घेताना व जीवनशैली जगताना काही वाईट सवयी लागतात, ज्यामुळे त्यांना कमी ऊर्जा किंवा थकवा येऊ शकतो. (फोटो: indian express)

या वाईट सवयींमुळे शरीरातील रक्तातील साखरेची पातळी वाढू लागते. जाणून घेऊयात कोणत्या सवयी आहेत ज्याने तुम्हाला अधिक थकवा येऊ शकतो. (फोटो: indian express)

शरीर सक्रिय ठेवल्याने आरोग्याशी संबंधित अनेक समस्या आपल्यापासून दूर राहतात. यासाठी व्यायाम, धावणे किंवा चालणे आवश्यक आहे. (फोटो: indian express)

मधुमेहाच्या रुग्णांना सक्रिय राहण्याचा सल्ला दिला जातो, तरीही काही लोकं या महत्त्वाच्या टिपकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे त्यांना अधिक थकवा येऊ शकतो. (फोटो: indian express)

मधुमेहाचे रुग्ण असूनही काही लोकांना साखरेची इतकी आवड असते की ते गरजेपेक्षा जास्त प्रमाणात सेवन करू लागतात. (फोटो: indian express)

गोड पदार्थांचे जास्त सेवन केल्याने शरीरातील रक्तातील साखरेची पातळी खराब होते, तसेच तुम्हाला अधिक प्रमाणात थकवा जाणवतो. (फोटो: indian express)

जर तुम्ही पुरेसे पाणी प्यायले नाही, तर त्यामुळे शरीरातील ऊर्जा वाया जाते आणि अनेकदा थकवा येऊ शकतो. (फोटो: indian express)

तज्ञांचे म्हणणे आहे की लोकांनी दिवसातून सुमारे ३ लिटर पाणी प्यावे. (फोटो: indian express)

अनेक वेळा मधुमेही रुग्णांना पुरेशी झोप मिळत नाही आणि ती त्यांची सवय बनते. तज्ज्ञांच्या मते, मधुमेहाच्या रुग्णांसोबतच प्रत्येकाने पुरेशी झोप घेतली नाही, तर अनेकदा थकवा त्यांना त्रास देऊ शकतो. (फोटो: indian express)