
जेव्हा तुम्हाला थकवा जाणवतो तेव्हा बदामाचे सेवन करू शकतात. बदामामध्ये व्हिटॅमिन बी असते, जे अन्नाला उर्जेमध्ये रूपांतरित करण्याचे काम करते.

तसेच त्यात मॅग्नेशियम देखील आढळते जे स्नायूंच्या थकव्याशी लढण्यास मदत करते.

सफरचंद सेवन केल्याने व्यक्ती मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या सक्रिय राहू शकते.

सफरचंदमध्ये भरपूर ऊर्जा असते. याच्या सेवनाने थकवा दूर होतो. अशावेळी आहारात सफरचंदाचे नियमित सेवन करा.

पोटॅशियम, मॅग्नेशियम, फायबर, व्हिटॅमिन बी, हे चारही महत्त्वाचे पोषक तत्व केळीमध्ये आढळतात, ज्याचे सेवन केल्याने ऊर्जा तर मिळतेच पण माणसाला थकवाही जाणवत नाही.

थकवा जाणवत असल्यास डार्क चॉकलेटचे सेवन करा. कारण डार्क चॉकलेटमध्ये कॅफिन असते. तसेच सेरोटोनिनचे उत्पादन त्याच्या सेवनाने उत्तेजित होतात.

अशा परिस्थितीत जर तुम्हाला मानसिक आणि शारीरिक थकवा जाणवत असेल तर डार्क चॉकलेटच्या सेवनाने थकवा दूर होतो आणि भरपूर ऊर्जा मिळते.

आहारात नियमितपणे अंड्यांचे सेवन करा. कारण अंड्यांमध्ये प्रथिने तसेच हेल्दी फॅट देखील असतात.

अंड्याच्या सेवनाने शरीरातील ऊर्जा टिकवून ठेवण्यास मदत करतात. (all photo: indian express)