
रणरणत्या उन्हात घराबाहेर पडणे कोणालाच आवडत नाही, मात्र काही कारणास्तव बहुतांश लोकांना बाहेर जावं लागतं. त्यामुळे घर बाहेर पडल्यावर आपल्याला अति उष्णतेचा सामना करावा लागतो.
उन्हाळ्यात उष्माघात आणि हीट स्ट्रोक या समस्या निर्माण होतात. तसेच तुम्ही या पदार्थांचा समावेश करून तुम्ही पोटाच्या उष्णतेपासून आराम मिळवू शकता.
ओव्याची पाने ही पोटाची उष्णता शांत करणारी भाजी आहे, जी स्मूदी, सॅलड किंवा ज्यूसच्या स्वरूपात तुम्ही त्याचे सेवन करू शकतात.
यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते आणि त्याचे सेवन केल्याने शरीर हायड्रेटेड राहते.
उन्हाळ्यात डाएटमध्ये सत्तूच्या सरबतचा आवश्य समावेश करावा. सत्तू म्हणजे भट्टीत भाजलेल्या चन्याचे पीठ होय.
‘डिंक कटिरा’ हा डिंकातील द्रव सुकवून तयार केलेला कोरडा पदार्थ असतो. थंडीचा प्रभाव असणारा डिंक कटिरा आजही ग्रामीण भागात मोठ्या आवडीने वापरला जातो.
उन्हाळ्यात उष्माघात आणि हीट स्ट्रोक हे खूप धोकादायक असतात. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही २ चमचे डिंक कटिरा १ ग्लास पाण्यात रात्रभर भिजवून ठेवा. जेव्हा हा डिंक चांगला फुगून येईल तेव्हा त्यात साखर मिसळून हे मिश्रण खा. याच्या सेवनाने उन्हाच्या तीव्र झळा आणि उष्माघातापासून तुमचा बचाव होतो.
उन्हाळ्यात अॅसिडिटी, पोट फुगणे यामुळेही पोटात जळजळ होऊ शकते. उन्हाळ्यात उद्भवणार्या या समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी गुलकंदाचे सेवन करावे.
गुलकंद आतड्यांसंबंधी आणि पोटाच्या समस्येपासून आराम देते. (all photo: indian express)