
आधार कार्ड हे सर्वात महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक आहे. त्याचा वापर बँकांपासून शाळा, महाविद्यालये, सरकारी-निमसरकारी कार्यालये आणि इतर ठिकाणी केला जातो. त्यामुळे त्यात केलेली छोटीशी चूक तुमचे मोठे नुकसान करू शकते.

आधार कार्डमध्ये काही चूक झाली असेल तर तुम्ही ती दुरुस्त करू शकता. यामध्ये नाव, जन्मतारीख आणि पत्ता बदलण्याची सुविधा मिळते.

आधार कार्डमधील नाव चुकीचे असल्यास यूआयडीएआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, वापरकर्ता त्याचे नाव फक्त एकदाच बदलू शकतो.

तुमची जन्मतारीख आधार कार्डमध्ये चुकली असेल, तर तुम्ही ती एकदाच बदलू शकता. याशिवाय आधार कार्डमध्ये जन्मतारीख बदलण्याची तरतूद नाही.

आधार कार्डमधील पत्ता तुम्ही एकदाच बदलू शकता हे लक्षात ठेवा.

आधार कार्डमध्ये कोणतेही बदल करण्यासाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही. हे काम तुम्ही घरबसल्या इंटरनेटच्या माध्यमातून करू शकता.