
‘लवकर जेवावे आणि लवकर झोपावे’, असे आपल्या घरातील वडीलधारी मंडळी आपल्याला नेहमी सांगतात.
अनेकदा आपण याकडे दुर्लक्ष करतो. मात्र यामुळे होणारे अनेक फायदे आपल्याला माहीत नाहीत.
रात्री लवकर जेवण केल्याने तुमच्या पचनसंस्थेला रात्रभर विश्रांती मिळते. पचनसंस्थेचे योग्य कार्य आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे.
रात्री जेवण चांगले पचते. याचे कारण म्हणजे जसजसा दिवस पुढे सरकतो, तसतसे आतड्यांमधील ऍसिडस् आणि एन्झाईम्सचा स्राव कमी होतो.
अॅसिड रिफ्लक्सची समस्या असणाऱ्यांनी रात्रीचे जेवण लवकर घ्यावे. यामुळे त्यांना खूप फायदा होईल.
उपवास करण्याचे अनेक फायदे आहेत. याचा मुख्य फायदा म्हणजे आपल्या पचनसंस्थेला विश्रांती घ्यायला वेळ मिळतो.
आपण रात्री लवकर जेवण केले तर, १२ ते १४ तास आपण सहज उपवास ठेवू शकतो.
जर अन्न पचवण्यात तुमच्या शरीराला जास्त संघर्ष करावा लागला नाही, तर तुमची झोप चांगली होईल आणि सकाळी अधिक ताजेतवाने जागे व्हाल.
येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. (सर्व फोटो : Pexels)