
अनेक वेळा अचानकपणे आपल्याला उचकी लागते. मग ही उचकी थांबवायची कशी असा प्रश्न आपल्या समोर उभा राहतो. (Photo : Pixabay)
अनेक वेळा शरीरात पाण्याचं प्रमाण कमी झाल्यामुळे उचकी लागते असा काहींचा समज असतो. त्यामुळे साधारणपणे उचकी लागल्यानंतर आपण पाणी पितो. (Photo : Pexels)
मात्र पाणी प्यायल्यानंतरही अनेक वेळा या उचक्या काही केल्या थांबत नाही. या उचक्या थांबविण्यासाठी काही घरगुती उपाय आहेत.
जर तुम्हाला तुमच्या उचक्या थांबवायच्या असतील तर तुम्ही आइस बॅगचा वापर करू शकता. यासाठी एका आइस बॅगमध्ये बर्फ किंवा थंड पाणी भरून काहीवेळ तुमच्या मानेवर ठेवावे. (Photo : Pexels)
सततच्या उचक्या थांबवण्यासाठी अॅपल साईडर व्हिनेगर उपयुक्त ठरेल. यासाठी अॅपल साईडर व्हिनेगरचे काही थेंब तोंडात टाकावे, याने उचकी लगेचच थांबेल. (Photo : Pixabay)
अचानकपणे उचकी लागल्यास साखरेचे सेवन करावे. साखर खाल्यामुळे काही वेळानंतर उचकी लागणं आपोआप थांबते. (Photo : Pexels)
त्याशिवाय साखर आणि थोडं मीठ पाण्यात टाकून ते थोड्या थोड्या वेळाने प्यायल्यास उचकी थोड्यावेळात बंद होते. (Photo : Pexels)
उचकी आल्यावर एक चमचा लिंबाचा ताजा रस आणि एक चमचा मध एकत्र करुन त्याचे चाटण तयार करा. हे चाटण घेतल्यानंतर काही वेळात उचकी बंद होते. (Photo : Pixabay)
लहान मुलांना आवडणारं चॉकलेट उचकी थांबविण्यास अत्यंत उपयुक्त आहे. उचकी लागल्यानंतर एक चमचा चॉकलेट पावडर खावी. (Photo : Pexels)
या चॉकलेट पावडरमुळे लवकर आराम पडतो आणि उचकी थांबते. (Photo : Pexels)
अनेक वेळा घाईघाईमध्ये जेवण केल्यास उचकी लागते. त्यामुळे आपल्याला पाणी प्यावं लागतं आणि परिणामी पूर्ण जेवण होण्यापूर्वीच आपलं पोट पाण्यामुळे भरतं. (Photo : Pexels)
त्यामुळे जेवताना हळूहळू जेवावे.तसेच जेवणात अचानक तिखट पदार्थ आल्यास उचकी लागू शकते. (Photo : Pexels)
उचकी लागल्यास पीनट, बटर खावे किंवा टॉमॅटो खालल्यास उचकी थांबू शकते. (Photo : Pexels)
टॉमॅटो खाताना ते दातांनी न चावता सावकाश खावे त्यामुळे श्वास घेण्याची गती बदलते आणि उचकी बंद होण्यास मदत होते. (Photo : Pexels)
येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.