
रात्री हलका आहार घेण्याचा सल्ला दिला जातो. जर तुम्ही रात्री जड अन्न खाल्ले तर त्यामुळे अॅसिडीटी, फुगवणे, लठ्ठपणा अशा अनेक समस्या वाढू शकतात. त्यामुळे रात्रीच्या वेळी काही गोष्टी टाळण्याची गरज आहे. चला जाणून घेऊया रात्रीच्या वेळी कोणत्या पदार्थांचे सेवन करू नये? (फोटो – फ्रीपिक)

सकाळचा नाश्ता भरपेट करावा, दुपारचं जेवण थोडं कमी करावं आणि रात्रीचं जेवण अत्यंत हलकं घ्यावं असंही म्हटलं जातं. मात्र, अनेकदा आपण याकडे दुर्लक्ष करतो. अनेकदा काही जण रात्रीच्या जेवणात मसालेदार पदार्थ, फास्टफूड यांचा समावेश करतात.मात्र, ते शरीरासाठी अत्यंत चुकीचं आहे. (फोटो – फ्रीपिक)

रात्री जास्त भात आणि चपात्या खाऊ नका. ते पचायला बराच वेळ लागतो, ज्यामुळे गॅस, अॅसिडिटी सारख्या समस्या उद्भवू शकतात. (फोटो – फ्रीपिक)

रात्री रेड मीटचे सेवन टाळा. हे खूप जड आहे, जे पचनसंस्थेवर परिणाम करू शकते. (फोटो – फ्रीपिक)

रात्री चहा-कॉफीचे सेवन केल्याने निद्रानाश होऊ शकतो. (फोटो – फ्रीपिक)

रात्रीच्या वेळी मद्यपान आणि धूम्रपान करू नका. ते शरीरासाठी घातक ठरू शकते. (फोटो – फ्रीपिक)

रात्री डार्क चॉकलेट खाऊ नका. याचा तुमच्या झोपेवर परिणाम होतो. (फोटो – फ्रीपिक)

पिझ्झा, बर्गर, फ्राईज यासारखे फास्ट फूड आणि तळलेले पदार्थ रात्रीच्या वेळी खाणे टाळा. अपचन किंवा अॅसिडिटीमुळे निद्रानाश होऊ शकतो. . (फोटो – फ्रीपिक)

चायनीज पदार्थांमध्ये एमएसजी अर्थात मोनोसोडियम ग्लुटामेट असते. आरोग्याच्या दृष्टीने तो घातक असतोच पण त्यामुळे निद्रानाशही होऊ शकतो. . (फोटो – फ्रीपिक)