-
post office term deposit scheme and rates 2022 : तुम्ही एखाद्या सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय शोधत असाल तर तुम्हाला पोस्टाच्या एका अनोख्या योजनेबद्दल जाणून घ्यायला नक्कीच आवडेल.
-
पोस्टाच्या योजनांबद्दलची सकारात्मक बाब म्हणजे या योजनांमध्ये धोका म्हणजेच इनव्हेसमेंट रिस्क अजिताब नसते आणि परतावाही उत्तम मिळतो.
-
छोटी गुंतवणूक करायची असेल तर पोस्टाच्या स्मॉल सेव्हिंग स्कीम म्हणजेच अल्प बचत योजनांमध्ये गुंतवणूक करता येईल.
-
छोट्या गुंतवणुकीसाठी टर्म डिपॉजीट म्हणजेच टीडी हा एक उत्तम पर्याय आहे. टर्म डिपॉजीटचा फायदा बँकांबरोबरच पोस्टाच्या योजनांमधूनही मिळतो.
-
पोस्टाच्या योजनांमध्ये पैसे गुंतवणे ही सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. हे पैसे निश्चितपणे परत मिळण्याची खात्री असल्याने अनेकजण या योजनांना प्राधान्य देतात.
-
टर्म डिपॉजीटमध्ये उत्तम परतावा मिळण्याची शक्यता अधिक असते. या योजनेअंतर्गत एका वर्ष, दोन वर्ष, तीन वर्ष आणि पाच वर्षांसाठी गुंतवणूक करता येते. या कालावधीमध्ये वेगवगेळ्या दराने या गुंतवणुकीवर व्याज मिळते.
-
पोस्टाच्या टर्म डिपॉजीट योजनेअंतर्गत सुरुवातीच्या सहा महिने पैसे भरल्यानंतर पुढील गुंतवणूक शक्य झाली नाही तर खातं बंद करता येतं.
-
पोस्टाच्या योजनांमध्ये पैसे गुंतवणे ही सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. हे पैसे निश्चितपणे परत मिळण्याची खात्री असल्याने अनेकजण या योजनांना प्राधान्य देतात.
-
सहा महिने ते १२ महिन्यांच्या कालावधीमध्ये या योजनेअंतर्गत बचत खात्यांचं व्याजदर लागू होतं. अचानक खातं बंद केल्यास टर्म डिपॉजीटचं व्याजदर गुंतवणुकीवर लागू होत नाही.
-
एक वर्ष, दोन वर्ष आणि तीन वर्षाच्या कालावधीसाठी टर्म डिपॉजीटवर वर्षाला ५.५ टक्के व्याज मिळतं. यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणुकदाराचं किमान वय १८ असणं बंधनकारक आहे.
-
मात्र १० वर्षांहून अधिक वय असणाऱ्या मुलांच्या नावानेही पालकांच्या माहितीच्या आधारे खातं सुरु करता येतं. किमान एक हजार रुपये गुंतवणूक करुन मुलांच्या नावाने खातं सुरु करता येतं. मुलांच्या नावाने सुरु केलेल्या खात्यावर कमाल गुंतवणूक किती असावी याचं काही बंधन नाही.
-
पाच वर्षांच्या टर्म डिपॉजीटवर वार्षिक ६.७ टक्के दराने व्याज मिळतं.
-
म्हणजेच एखाद्याने १ लाख रुपये पाच वर्षांच्या मॅच्युरिटी पिरिएडसाठी गुंतवले तर ६.७ टक्के दराने वार्षिक व्याजाच्या हिशेबाने पाच वर्षानंतर त्या व्यक्तीला १ लाख ३९ हजार रुपये परत मिळतील.
-
टर्म डिपॉजीटवर नॉमिनेशन सुविधा, खातं एका पोस्ट ऑफिसमधून दुसऱ्या पोस्ट ऑफिसमध्ये वर्ग करणं यासारख्या सुविधाही या सेवेसंदर्भात पुरवल्या जातात.
-
एकाच पोस्ट ऑफिसमध्ये टर्म डिपॉजीट खातं सुरु करणं, सिंगल अकाऊंट जॉइण्ट करण्याची किंवा जॉइण्ट अकाऊंट सिंग करण्याची सुविधा पुरवली जाते.
-
तसेच गुंतवणुकीचा कालावधी संपल्यानंतर तो वाढवण्याची सुविधाही पुरवली जाते. ऑनलाइन माध्यमातूनही टर्म डिपॉजीट खातं सुरु करता येतं.

“कर्म फिरून येतंच…” शेतात आलेल्या सापाला तरुणानं ट्रॅक्टरच्या चाकाखाली अक्षरश: चिरडून टाकलं; सापाचा VIDEO पाहून धक्का बसेल