-
जगभरात मधूमेह रुग्णांची संख्या वाढत आहे. मधूमेह रुग्णांनी आहाराची विशेष काळजी घेणे गरजेचे असते. कारण आहारातून रक्तातील साखरेची पातळी वाढण्याची शक्यता असते.
-
अशावेळी मधूमेह असणाऱ्या व्यक्तींनी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करणारे पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो.
-
रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी कोणते पदार्थ मदत करतात जाणून घ्या.
-
दालचिनी : दालचिनीमध्ये अनेक पोषक तत्त्व आढळतात. दालचिनी खाल्ल्याने मधूमेह रुग्णांमधील बॉडी मास इंडेक्स कमी करण्यास फायदा झाल्याचे दिसून आले आहे. यासह दालचिनी खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत मिळते.
-
भेंडी : भेंडीमध्ये पॉलिसेकेराइड आढळतात, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. तसेच भेंडीची भाजी फ्लेव्होनॉइड्सचा उत्तम स्त्रोत मानले जाते. फ्लेव्होनॉइड्स हे एक अँटिऑक्सिडंट आहे ज्यामुळे हृदय निरोगी राहण्यास मदत होते.
-
दही : हाय ब्लड शुगर नियंत्रित ठेवण्यासाठी दही फायदेशीर ठरते. दह्यासारख्या प्रोबायोटिक्स असणाऱ्या आमलेल्या पदार्थांचे सेवन केल्याने रक्तातील साखर नियंत्रित राहण्यास मदत होते.
-
शेंगा, सोयाबीन, चणे, मसूर असे पदार्थ खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते.
-
बिया : रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी काही बिया मदत करू शकतात. यासाठी भोपळ्याच्या बिया, अंबाडीच्या बिया, चिया बिया यांचे सेवन करू शकता.
-
या बियांमध्ये अनेक पोषक तत्वे असतात. तसेच यामध्ये फायबर आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करणारे अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात आढळतात. हाय ब्लड शुगरचा त्रास असणाऱ्यांना यामुळे फायदा होऊ शकतो.
-
(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)
-
(सर्व फोटो सौजन्य : Freepik)

Pimpri-Chinchwad : “आमच्याकडे ज्यांनी उमेदवारी मागितली होती, त्यांनी शांत रहावं म्हणून…” अजित पवारांचं विधान!