-
नाश्ता हे आपल्या दिवसाचं पहिलं जेवण असतं. यामुळे आपल्या शरीराला ऊर्जा तर मिळतेच, पण यातून आरोग्यासाठी आवश्यक असलेले अनेक पोषक तत्त्वही मिळतात.
-
पण बरेच लोक सकाळच्या वेळेत इतके व्यस्त असतात की ते सर्रास आपला नाश्ता टाळतात. ऑफिसला जाताना उशीर होणं, नाश्ता करावंस न वाटणं किंवा डाएटिंग ही यामागची कारणे असू शकतात.
-
तुम्हालाही सकाळी नाश्ता करायला आवडत नसेल तर यामुळे तुमच्या आरोग्यावर चुकीचा परिणाम होऊ शकतो. आज आपण सकाळचा नाश्ता न केल्याने कोणकोणते दुष्परिणाम होऊ शकतात, याबद्दल जाणून घेऊया.
-
सकाळचा नाश्ता हे आपलं दिवसातील पाहिलं जेवण असतं. रात्रीच्या जेवणानंतर जवळपास आपण ७ ते ८ तासांनी ते खात असतो. अशा परिस्थितीत जर तुम्ही रोजच सकाळचा नाश्ता करणे टाळत असाल तर यामुळे तुमच्या शरीरात उपयुक्त पोषक तत्त्वांची कमतरता भासू शकते.
-
तुम्ही सकाळचा नाश्ता टाळलात तर तुमच्या आरोग्यावर त्याचा वाईट प्रभाव पडू शकतो. जर तुम्हाला सकाळच्या वेळेस काही जड खायचे नसेल तर हलके खा. पण तुम्ही जे काही खात आहात ते पोषक तत्वांनी परिपूर्ण असले पाहिजे.
-
सकाळचा नाश्ता आपल्या मेटाबॉलिज्मला बूस्ट करते. जर तुम्ही सकाळचा नाश्ता केला नाही तर त्याचा तुमच्या मेटाबॉलिज्मवरही विपरीत परिणाम होतो. नाश्ता न केल्याने चयापचय क्रिया मंदावते. परिणामी कमी कॅलरी बर्न होतात.
-
सकाळचा नाश्ता वगळल्याने तुमची प्रतिकारशक्तीही कमकुवत होते. रात्रीचे जेवण आणि सकाळच्या नाश्त्यामध्ये ७ ते ८ तासांचे अंतर असते.
-
अशा परिस्थितीत जर तुम्ही सकाळचा नाश्ताही केला नाही तर पेशी खराब होऊ शकतात. म्हणूनच, जर तुम्हाला रोगप्रतिकारक पेशी निरोगी ठेवायच्या असतील तर दररोज नाश्ता करा.
-
नाश्ता वगळल्याने जंक फूड खाण्याची लालसा वाढू शकते. त्यामुळे नाश्ता करणे टाळू नका. नाश्ता करायला वेळ नसेल तर तुम्ही सफरचंद किंवा उकडलेले अंडेही खाऊ शकता.
-
नाश्ता वगळल्याने तुमचे वजन वाढण्याचा धोकाही वाढू शकतो. कारण सकाळचा नाश्ता न केल्यावर तुम्ही दुपारी जास्त जेवणार. परिणामी तुमचे वजन वाढू शकते.
-
नाश्ता वगळल्याने मेंदूवर वाईट परिणाम होतो. यामुळे मायग्रेनच्या तक्रारीही वाढू शकतात. केसगळतीबरोबरच पचनावरही वाईट परिणाम होऊ शकतो.
-
स्टाइलक्रेझच्या मते, नाश्ता वगळल्याने हृदयाशी संबंधित समस्या वाढू शकतात. याने हृदयविकाराचा धोका २७ टक्क्यांनी वाढू शकतो. तसेच उच्च रक्तदाबाची समस्या उद्भवू शकते. त्याचबरोबर टाइप २ मधुमेहाचा धोकाही वाढू शकतो. (सर्व फोटो : Pexels)
“…भाजपात आलोय, ही माझी अडचण”; फडणवीसांच्या उपस्थितीत भरसभेत नारायण राणेंचं विधान!