-
योग्य प्रमाणात पाणी प्यायलास आरोग्यासाठी ते हितकारक असते. परंतु कुठलाही अतिरेक चांगला नसतो, या तत्त्वानुसार जास्त पाणी पिणे हेही हानिकारक असते. जास्त पाणी पिण्याने सुदृढ निरोगी व्यक्तीची तब्येत बिघडू शकते.
-
त्याचबरोबर जास्त पाणी प्यायल्याने स्नायू कमकुवत होणे, पेटके येणे किंवा आकडी येण्यासारखे प्रकार होऊ शकतात. जर आपल्याला सतत तहान लागत नसेल, आपल्या मूत्राचा रंग फिकट पिवळा अथवा रंगहीन असेल तर आपल्या शरीरात संतुलित मात्रेत पाणी असल्याचे ते लक्षण आहे.
-
एका प्रौढ व्यक्तीस दररोज आठ ते बारा पेले पाणी पुरेसे असते. आपल्या शरीराच्या प्रत्येकी २० किलोला एक लिटर पाणी लागते.
-
आहारतज्ज्ञांच्या मते पुरुषांना सरासरी १५.५ कप (३.७ लिटर) व स्त्रियांना ११.५ कप (२.७ लिटर) पाणी पुरेसे ठरते. ही गरज थेट पाण्याशिवाय, आपण दिवसभर घेत असलेली पेय आणि अन्नातूनही पूर्ण होते.
-
आपल्या आहारातून दैनंदिन २० टक्के पाणी शरीराला मिळते. उर्वरित थेट पाणी अथवा पेयांतून मिळते. ५० टक्के साधे पाणी आणि ५० टक्के दूध, फळे, भाजीपाल्यातून आपल्या शरीराची पाण्याची गरज भागवणे योग्य ठरते.
-
आज आपण अतिप्रमाणात पाणी प्यायल्याने आपल्याला कोणकोणते शारीरिक नुकसान होऊ शकते याबद्दल जाणून घेऊया.
-
जेव्हा आपण जास्त पाणी पितो, तेव्हा आपल्याला वॉटर पॉइजनिंग, इंटॉक्सिकेशन किंवा मेंदूच्या कार्यामध्ये व्यत्यय येऊ शकतो. जेव्हा पेशींमध्ये जास्त पाणी असते तेव्हा त्या सुजतात आणि हा त्रास जाणवू शकतो.
-
जेव्हा आपण जास्त पाणी पितो, तेव्हा आपल्याला वॉटर पॉइजनिंग, इंटॉक्सिकेशन किंवा मेंदूच्या कार्यामध्ये व्यत्यय येऊ शकतो. जेव्हा पेशींमध्ये जास्त पाणी असते तेव्हा त्या सुजतात आणि हा त्रास जाणवू शकतो.
-
जेव्हा मेंदूच्या पेशी फुगतात तेव्हा त्या दबाव निर्माण करतात. यामुळे आपल्याला गोंधळ, तंद्री आणि डोकेदुखी यासारख्या गोष्टींचा अनुभव येऊ शकतो. हा दाब वाढला तर त्यामुळे उच्च रक्तदाब आणि कमी हृदय गती यांसारखे आजार होऊ शकतात.
-
ओव्हरहायड्रेशनमुळे सोडियम इलेक्ट्रोलाइटवर सर्वाधिक परिणाम होतो, ज्यामुळे हायपोनेट्रेमिया नावाची स्थिती उद्भवते. सोडियम हा एक महत्त्वाचा घटक आहे जो पेशींच्या आत आणि बाहेरील द्रवांचे संतुलन राखण्यास मदत करतो.
-
शरीरात जास्त प्रमाणात पाण्यामुळे त्याची पातळी घसरते तेव्हा द्रव पेशींच्या आत पोहोचतात. त्यानंतर पेशी फुगतात, यामुळे आपल्याला आकडी येणे, कोमा किंवा मृत्यूचा धोका निर्माण होतो.
-
येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. (सर्व फोटो: Pexels)

शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह कोणाचे? निवडणूक आयोगापुढे उद्या होणाऱ्या सुनावणीवर अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले…