-
सततचे काम, प्रवास आणि चिंता यामुळे प्रत्येकाचीच जीवनशैली अतिशय व्यस्त झाली आहे. इतकी की आपल्याकडे व्यायाम करायला आणि आपल्या आहाराकडे लक्ष द्यायलाही पुरेसा वेळ नाही. मात्र आपल्या स्वास्थ्याकडे दुर्लक्ष केल्याने अनेक आजारांचा धोका वाढू शकतो.
-
तुमच्याकडे व्यायाम करायला वेळ नसेल किंवा काही कारणाने तुम्हाला ते शक्य होत नसेल, तर एका सोप्या पद्धतीनेही तुम्ही आपल्या आरोग्याची काळजी घेऊ शकता. तुमच्या आरोग्यासाठी रात्रीच्या जेवणानंतर चालण्यासारखा सोपा सरळ मार्ग देखील मोठा फायदेशीर ठरू शकतो. ज्याला आपण ‘शतपावली’ असं म्हणतो.
-
केवळ १०-१५ मिनिटं केलेल्या शतपावलीमुळे आपल्या आरोग्याला होणारे फायदे जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. रात्री जेवल्यावर लगेचच झोपू नये असे म्हणतात. जेवल्यानंतर चालल्याने म्हणजेच शतपावली केल्याने रात्रीच्या जेवणातील अंतर आणि आपली झोपण्याची वेळ यातील अंतर वाढते. यामुळे आपल्या शरीराला इतरही अनेक फायदे होतात. हे फायदे जाणून घेऊया.
-
जेवल्यानंतर साधारणतः २० मिनिटांनी रक्तातील साखरेची पातळी वाढू लागते. पण रात्रीच्या जेवणानंतर फिरायला गेल्यास आपले शरीर काही प्रमाणात ग्लुकोज वापरते, यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते.
-
रात्रीच्या जेवणानंतर चालल्याने आपल्या शरीराला अधिक गॅस्ट्रिक एंजाइम तयार करण्यास मदत मिळते. यामुळे आपली पचनशक्ती सुधारते, बद्धकोष्ठता कमी होते आणि पोटाशी संबंधित इतर समस्यांपासूनही दूर राहता येते.
-
रात्रीच्या जेवणानंतर चालल्याने आपली पचनशक्ती सुधारून शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते. यामुळे आपले अंतर्गत अवयव चांगले कार्य करतात आणि आपली प्रतिकारशक्ती वाढते. मजबूत प्रतिकारशक्ती विविध संक्रमणांना दूर ठेवण्यात मदत करते.
-
आपली चयापचय शक्ती वाढवण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे रात्रीच्या जेवणानंतर लगेच झोपण्याऐवजी काहीवेळ चालायला जाणे. हे आपल्याला विश्रांतीच्यावेळी अधिक कॅलरी बर्न करण्यास मदत करते. हे आपले शरीर चांगल्या स्थितीत ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते.
-
अनेकदा आपल्याला रात्रीच्या जेवणानंतरही मध्यरात्री भूक लागते. अशावेळी केलेले मिडनाईट स्नॅकिंग अपायकारक असते. जर तुमचं पोट आधीच भरलेलं असेल तर हे मिडनाईट स्नॅकिंग तुमच्या वजन कमी करण्याच्या प्रयत्नात अडथळा आणू शकतं. अशा परिस्थितीत रात्री जेवल्यानंतर चालायला जाणे फायदेशीर ठरू शकते.
-
इतकंच नाही तर रात्री जेवून चालणं आपला तणाव दूर करण्यास आणि आपल्या शरीरातील एंडोर्फिन रिलीज करण्यास देखील मदत करते. यामुळे तुम्हाला छान वाटतं आणि तुमचा मूड देखील चांगला राहतो. त्यामुळे, रात्रीच्या जेवणानंतर चालणं तुम्हाला आनंदी ठेवू शकतं आणि तुम्ही नैराश्यावर मात करू शकता.
-
रात्रीच्या जेवणानंतर चालणं देखील तुमच्या मानसिक आरोग्य राखण्यासाठी देखील फायदेशीर ठरतं. जर तुम्हाला रात्री शांत झोप लागण्यास समस्या जाणवत असेल तर रोज रात्री जेवणानंतर फिरायला जा.
-
येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. (Photos: Freepik)

उमेदवारी अर्ज मागे घेणार का? प्रश्न विचारताच अभिजित बिचुकले भडकले; म्हणाले, “मी राज ठाकरेंपेक्षा…”