-
आरोग्यतज्ज्ञ म्हणतात की आपण आपला आहार ऋतुनुसार बदलायला हवा. यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. उदाहरणार्थ, हिवाळ्यात बाजरीचे पीक जास्त येते, यामुळेच उन्हाळ्यात बाजरीचे पदार्थ कमी खाल्ले जातात.
-
आपले शरीर आपल्याला ऋतुच्या हिशोबाने आहार करण्याचे संकेत देते. जसे की हिवाळ्यात आपल्याला गरम सूप किंवा शिजवलेल्या भाज्या खाण्याचे मन करते, तर उन्हाळ्यात आपल्याला कोशिंबीर किंवा थंड पदार्थ खावेसे वाटतात.
-
मुंबईतील पोषणतज्ञ करिश्मा चावला आपल्या रुग्णांना हिवाळ्यात मध, सुका मेवा, कांदा, लसूण, सफरचंदासह इतर हंगामी फळे, चणे आणि पालेभाज्या खाण्याचा सल्ला देतात.
-
करिश्मा म्हणतात की हिवाळ्यात अशा गोष्टी खायला हव्या जे शरीरासाठी अँटिऑक्सिडंट्सचे काम करेल. म्हणूनच आहारात झिंक आणि फॅट्सने समृद्ध पदार्थांचा वापर करावा.
-
व्हिटॅमिन सी आणि ई असलेल्या भाज्या: हिरव्या पालेभाज्या, ब्रोकोली, ओवा, भोपळी मिरची, काजू, संपूर्ण चणे, सफरचंद आणि पपई
-
झिंकने समृद्ध पदार्थ: तीळ, भोपळ्याच्या बिया, पोल्ट्री उत्पादने, बीन्स, काजू, दही, बदाम, मटार आणि मशरूम
-
चांगल्या फॅट्सने समृद्ध पदार्थ: नारळाचे तेल, ऑलिव्ह ऑइल, तीळ, अखरोड, बदाम, ओमेगा 3 रिच सप्लीमेंट्स
-
करिश्मा म्हणतात की हिवाळ्यात विशिष्ट पदार्थ खाण्यास मनाई नसली तरीही तिखट खाण्याच्या नावावर जंक फूडचे अतिसेवन करू नये.
-
गरम चहा, कॉफी, गरम दूध किंवा हर्बल चहा यासारख्या गरम गोष्टींचे साखर न घालता सेवन करणे हिवाळ्यात मानवी आरोग्यासाठी खूप चांगले असते.
-
हिवाळ्यात मसालेदार पदार्थ खूप चवदार लागतात. या पदार्थांची चव वाढवण्यासाठी लिंबू किंवा सुके मसाले वापरता येतात.
-
करिश्मा चावला म्हणतात की, पौष्टिक गोष्टी योग्य प्रमाणात योग्य ऋतूत आणि योग्य वेळी खाल्ल्या पाहिजेत.
-
लक्षात ठेवा की शरीर नेहमी होमिओस्टॅसिस राखण्याचा प्रयत्न करते आणि जेव्हा ते निसर्गाच्या सर्वात जवळ असते तेव्हा सर्वोत्तम कार्य करते. (Photos: Freepik)

“मी साडेचार वर्षांपूर्वी डेटवर…”, प्राजक्ता माळीचा खासगी आयुष्याबाबत खुलासा