-
Lakshmi Narayan Rajyog: जेव्हा प्रत्येक राशीच्या कुंडलीत ग्रह अनेक शुभ- अशुभ योग तयार करतात. यापैकी सर्वात भाग्यवर्धक व शुभ मानला जाणारा योग म्हणजे लक्ष्मी नारायण राजयोग
-
२०२३ मधील पहिला वाहिला लक्ष्मी नारायण राजयोग हा फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला तयार होत आहे. यावेळेस शुक्र व बुध ग्रहाच्या युतीने हा योग कुंभ राशीत तयार होत आहे.
-
विशेष म्हणजे ३० वर्षांनी पहिल्यांदाच कुंभ राशीत शनिदेव स्थित आहेत अशावेळी हा राजयोग तयार होणे हे काही राशींसाठी अत्यंत लाभदायक ठरू शकते.
-
कुंभ राशीत लक्ष्मी नारायण राजयोग तयार होताच ३ राशी धनलाभ मिळून श्रीमंत होऊ शकतात तसेच त्यांना प्रचंड प्रतिष्ठा, मान व प्रेम लाभू शकते. या भाग्यवान राशी कोणत्या हे जाणून घेऊयात..
-
सिंह राशी (Leo Zodiac): सिंह राशीसाठी लक्ष्मी नारायण राजयोग हा शुभ व लाभदायक सिद्ध होऊ शकतो. आपल्या राशीच्या कुंडलीत सप्तम स्थानी हा राजयोग तयार होत आहे. हे स्थान वैवाहिक जीवन व पार्टनरशिपशी संबंधीचे आहेत. येत्या दिवसांमध्ये जोडीदारासह नात्यात गोडवा वाढू शकतो.
-
तुम्हाला सुख, दुःख व पैसे हे पार्टनरशिपमध्ये वाटून घेणे अत्यंत फायदेशीर ठरू शकते. येत्या काळात नोकरदार मंडळींना कामाच्या ठिकाणी प्रमोशनसह पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे.
-
मिथुन राशी (Gemini Zodiac): मिथुन राशीच्या मंडळींसाठी लक्ष्मी नारायण राजयोग हा अच्छे दिन घेऊन येऊ शकतो. आपल्या राशीच्या कुंडलीत हा राजयोग नवव्या स्थानी तयार होत आहे.
-
आपल्याला नवीन जॉबची ऑफर येण्याची शक्यता आहे. आपल्या प्रलंबित कामांना दिशा व वेग मिळू शकते. तुम्हाला सुरु केलेल्या प्रत्येक कामात यश मिळू शकते.
-
वृश्चिक राशी (Scorpio Zodiac): लक्ष्मी नारायण राजयोग वृश्चिक राशीला लाभदायक ठरू शकतो. ग्रह गोचर होऊन आपल्या कुंडलीत चतुर्थ स्थानी हा राजयोग तयार होत आहे. हे स्थान भौतिक सुखाचे स्थान मानले जाते. तसेच ज्यांचे काम रिअल इस्टेटशी संबंधित आहे त्यांना पूर्ण वर्ष लाभदायक सिद्ध होऊ शकते.
