-
वाढलेल्या वजनावर नियंत्रण मिळवण्याची दोन पारंपरिक साधने म्हणजे आहार आणि व्यायाम. बहुतेक लोक आहार आणि नियमित वर्कआउट करून आपले वजन नियंत्रित करतात.
-
पण या धावपळीच्या जीवनात प्रत्येकालाच जिममध्ये वर्कआउट करणे शक्य होत नाही आणि परिणामी लठ्ठपणा दिवसेंदिवस वाढत जातो.
-
वाढत्या वजनामुळे रक्तदाब आणि मधुमेह यांसारख्या अनेक जुनाट आजारांचा धोका निर्माण होतो. म्हणूनच वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.
-
जर तुमच्याकडे वेळेची कमतरता असेल आणि तुम्ही डाएटिंग करू शकत नसाल तर काही अतिशय सोप्या पद्धतींचा अवलंब करून तुम्ही तुमचे वजन सहज नियंत्रित करू शकता.
-
हेल्थलाइनच्या बातमीनुसार, तुमची खाण्या-पिण्याची पद्धत वजन नियंत्रित करण्यासाठी खूप प्रभावी ठरते. काही खास टिप्स तुम्हाला सहजपणे कमी कॅलरीज खाण्यास मदत करू शकतात आणि भविष्यात वजन वाढण्यापासून रोखू शकतात.
-
तुम्हालाही डाएट किंवा व्यायामाशिवाय वजन कमी करायचे असेल तर या पाच सोप्या पद्धती फॉलो करा.
-
जर तुम्ही अन्न नीट चावून खाल्लं तर तुमच्या जेवणाचा वेग मंदावेल. जेव्हा तुम्ही चावून खाता तेव्हा तुम्ही अन्नाचे सेवन कमी करता आणि तुमची भूकही शांत होते.
-
खाण्याच्या वेळेचा तुमच्या वजनावर परिणाम होऊ शकतो. पटापट खाणाऱ्यांचे वजन वाढण्याचे प्रमाण हळूहळू खाणाऱ्यांच्या तुलनेत जास्त असते, असे अनेक संशोधनातून समोर आले आहे. हळू हळू चावून खाल्ल्यास पचन सुरळीत राहते आणि वजनही नियंत्रणात राहते.
-
तुमचे जेवनाचे ताट जितके मोठे असेल तितकेच तुमच्या खाण्याचे प्रमाण जास्त असणार. म्हणूनच तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर तुमच्या ताटाचा आकार कमी करा. जेवणाच्या वेळी लहान प्लेट वापरल्याने तुम्हाला कमी खाण्यास मदत होते.
-
प्रथिनांचा आपल्या भुकेवर मोठा प्रभाव पडतो. आहारात प्रथिनांचे सेवन केल्याने भूक शांत राहते आणि आपण कमी कॅलरीचे सेवन करतो.
-
भूक शमवण्याच्या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या अनेक हार्मोन्सवर प्रथिने परिणाम करतात. सकाळच्या नाश्त्यामध्ये धान्याचे सेवन करण्यापेक्षा प्रथिनेयुक्त अंड्यांचे सेवन केल्यास तुम्ही अगदी सहजपणे आपल्या वजनावर नियंत्रण मिळवू शकता.
-
फायबरयुक्त पदार्थ खाल्ल्याने भूक शांत होते आणि जास्त वेळ भूक लागत नाही. अनेक संशोधनांमध्ये हे समोर आले आहे की आहारात फायबरचे सेवन केल्याने वजन कमी होते आणि दीर्घकाळ भूक नियंत्रित राहते.
-
व्हिस्कोस हा एक चिकट फायबर आहे जो पाण्याच्या संपर्कात आल्यावर जेलमध्ये बदलतो. हे जेल पोषक तत्वांचे शोषण वेळ वाढवते आणि पोट रिकामे होण्याची प्रक्रिया मंदावते. व्हिस्कोस फायबर बीन्स, ओट्स, ब्रसेल्स स्प्राउट्स, शतावरी, संत्री आणि फ्लेक्स बियांमध्ये असते.
-
पिण्याचे पाणी तुम्हाला कमी खाण्यास आणि वजन कमी करण्यास मदत करू शकते. विशेषतः जेवणापूर्वी प्यायलेले पाणी अधिक फायदेशीर ठरते. एका अभ्यासात असे दिसून आले आहे की जेवण करण्यापूर्वी सुमारे ३० मिनिटे अर्धा लिटर पाणी प्यायल्याने भूक कमी होते आणि कॅलरीजचे प्रमाण कमी होते.
-
१२ आठवड्यांच्या कालावधीत जेवणापूर्वी पाणी प्यायलेल्या लोकांनी, पाणी न पिणार्या लोकांपेक्षा ४४% जास्त वजन कमी केले. तुम्ही सोडा किंवा ज्यूस सारख्या कॅलरीयुक्त पेये न पिता त्या जागी पाणी प्यायलयास तुम्ही तुमचे वजन अधिक प्रभावीपणे कमी करू शकता. (Freepik)
