-
ग्रीन टी हा एक प्रकारचा चहा आहे जो कॅमेलिया सायनेन्सिस वनस्पतीच्या पानांपासून बनवला जातो. त्याची चव दुधाच्या चहापेक्षा अतिशय वेगळी असते.
-
ग्रीन टीचे सेवन केल्याने मेटाबॉलिजम सुधारते आणि लठ्ठपणावर नियंत्रण मिळवता येते. याचे नियमितपणे सेवन केल्यास रोगप्रतिकरक शक्तीही वाढते त्याचबरोबर यामुळे ताण कमी होतो आणि त्वचाही निरोगी राहते.
-
असे म्हणतात की कॅन्सरसारख्या रोगांपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी ग्रीन टीचे सेवन करणे फायदेशीर ठरते.
-
ग्रीन टीचे सेवन केल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहत असल्याने मधुमेहाचे रुग्णही याचे सेवन करू शकतात. यामुळे अनेक शारीरिक समस्या दूर होतात, त्याचबरोबर त्वचेच्या समस्यांपासूनही आराम मिळण्यास मदत होते.
-
एका संशोधनातून समोर आलेल्या माहितीनुसार ग्रीन टीचे नियमित सेवन केल्याने ताण कमी होतो आणि मेंदूच्या कार्यप्रणालीमध्ये सुधार होतो. त्याचप्रमाणे याचे सेवन केल्याने एकाग्रताही वाढण्यास मदत होते.
-
कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि हृदयाचे विकार दूर ठेवण्यासाठी ग्रीन टीचे सेवन फायदेशीर ठरते. ज्या लोकांना रक्तदाबाची समस्या आहे तेही याचे सेवन करू शकतात.
-
ग्रीन टीचे सेवन आपल्या आरोग्यासाठी अनेकप्रकारे फायदेशीर ठरते. मात्र यांचे अतिसेवन करणेही नुकसानदायक ठरू शकते. होमिओपॅथी डॉ.मनदीप दहिया यांच्या मते, ग्रीन टीच्या अतिसेवनाने काही आजारही वाढू शकतात.
-
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, अनेक आजारांवर रामबाण औषध मानली जाणाऱ्या ग्रीन टीचे अनेक दुष्परिणामही आहेत. आज आपण ग्रीन टीचे शरीरावर होणारे दुष्परिणाम जाणून घेऊया.
-
ग्रीन टी हे कोणतेही औषध नाही जे प्रत्येक आजारावर प्रभावी ठरू शकेल. ज्या लोकांना डोकेदुखीचा त्रास आहे त्यांनी ग्रीन टीचे अजिबात सेवन करू नये. दिवसभरात २ ते ३ कप ग्रीन टीचे सेवन केल्यास डोकेदुखीची समस्या वाढू शकते.
-
ग्रीन टीमध्ये असलेले कॅफीन मायग्रेनची समस्या वाढवू शकते. पूर्ण दिवसात केवळ एक कप ग्रीन टीचे सेवन करणे पर्याप्त आहे. अन्यथा याच्या अतिसेवनाने फायद्याच्या जागी नुकसान होण्याची शक्यता अधिक आहे.
-
काही लोक वजन कमी करण्याच्या नादात दिवसातून तीन ते चार कप ग्रीन टीचे सेवन करतात. मात्र असे केल्याने शरीरात लोहाची कमतरता जाणवू लागते. यामुळे एनिमियाची समस्या उद्भवू शकते.
-
ग्रीन टीचे जास्त सेवन केल्यास घशात खवखव आणि आंबटपणा जाणवू शकतो. इतकेच नाही तर, वजन वेगाने कमी करण्यासाठी ग्रीन टीचे सेवन वाढवल्यास विष्ठेतून रक्त येऊ लागते. (Freepik)
