-
शनिदेव सर्वात मंद गतीने गोचर करणारा ग्रह आहे. एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्यासाठी अडीच वर्षांचा कालावधी लागतो.
-
प्रत्येक राशीतील गोचर कालावधी हा अडीच वर्षांचा असतो. त्या दरम्यान शनि वक्री किंवा अस्ताला जात असतो.
-
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह वेळोवेळी अस्त होतात आणि उगवतात, ज्याचा प्रभाव मानवी जीवन आणि पृथ्वीवर दिसून येतो.
-
३० जानेवारी रोजी शनिदेव कुंभ राशीत आपल्या घरी अस्त झाले आहेत आणि ५ मार्च रोजी त्यांचा उदय होणार आहे.
-
शनिदेव ३० जानेवारीला अस्त झाल्यामुळे अनेक राशींवर त्याचा प्रभाव झालेला दिसून येईल.
-
काही राशींसाठी शनिदेवाचे अस्त होणे सकारात्मक परिणाम घेऊन येणारे ठरणार आहे.
-
शनिदेवाच्या अस्तामुळे तीन राशींसाठी धन, संपत्तीचे योग बनत आहेत, चला तर जाणून घेऊया कोणत्या आहेत, या भाग्यशाली राशी..
-
शनिदेवाची स्थिती तुमच्यासाठी लाभदायक ठरू शकते. कारण शनिदेव तुमच्या संक्रमण कुंडलीत आठव्या आणि नवव्या घराचा स्वामी आहे. त्यामुळे यावेळी तुमचे नशीब तुमच्या सोबत असू शकते. तसेच आरोग्य सुधारू शकते. त्याचबरोबर धार्मिक कार्यात तुमची रुची वाढेल. तसेच, या काळात तुम्हाला तुमच्या मेहनतीचे पूर्ण फळही मिळेल.
-
मकर राशीच्या लोकांसाठी शनिदेवाचे अस्त होणे शुभ आणि फलदायी ठरू शकते. कारण शनिदेव तुमच्या राशीवरून धन आणि वाणीच्या भावाने अस्त करत आहेत. त्यामुळे तुम्हाला पैसे मिळत राहतील. या काळात तुमची आर्थिक स्थिती चांगली राहू शकते. तुमच्या राशीवर शनिदेवाचे राज्य असल्यामुळे शनिदेवाची स्थिती तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकते.
-
शनिदेवाची स्थिती तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकते. कारण शनिदेव तुमच्या राशीतून बाराव्या भावात बसत आहेत, तर तुम्हाला काही बाबींमध्ये सुरू असलेल्या तणावातून थोडा आराम मिळू शकतो. तसेच यावेळी तुम्हाला कोर्ट-कचेरी प्रकरणांमध्ये यश मिळू शकते. तुमची आर्थिक स्थितीही सुधारण्याची शक्यता आहे.
-
(टीप: वरील लेख हा गृहीतके व प्राप्त माहितीवर आधारित आहे)
