-
बदलत्या जीवन पद्धतींमुळे अनेक आजारांचा सामना करावा लागत असतो. (Pixabay)
-
यात, मधुमेह, कोलेस्ट्रॉल, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा आदी आजारांचा प्रामुख्याने समावेश होत असतो.
-
जगाच्या तुलनेत भारतात तर, मधुमेहींची संख्या झपाट्याने वाढत आहे. लठ्ठपणा, व्यायामाचा अभाव, फास्टफूड आदी कारणांमुळे मोठ्या प्रमाणात मधुमेहींची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे.
-
आपण या आजारांवर मात करण्यासाठी आपल्या घरातील स्वयंपाकखोलीतील पदार्थाचा आपल्या आहारात समावेश करुन या आजारांना दूर करु शकतो.
-
रवा हा प्रत्येकाच्या घरातील स्वयंपाकखोलीमध्ये असतो. मात्र, याचे तुम्हाला बरेचसे फायदे माहित नसतील. रवा खाल्ल्यानंतर पचनाचा त्रास होत नाही. हा सहज पचण्याजोगा अन्नपदार्थ आहे.
-
रवा खाल्ल्याने मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल आणि लठ्ठपणा यांसारखे आजार नियंत्रणात राहतात. चला तर मग जाणून घेऊया त्यामध्ये कोणते गुणधर्म आहेत, ज्यामुळे हे आजार दूर करण्यात मदत होते.
-
रव्यामध्ये कॅलरीज, कार्ब्स, प्रोटीन, थायमिन, फायबर, फोलेट, रिबोफ्लेविन, लोह, मॅग्नेशियम यांसारखे पोषक घटक आढळतात. जे शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर त्याचा आहारात समावेश करणे चांगले आहे.
-
त्यात फायबरचे प्रमाणही चांगले असते, जे हृदयरोग नियंत्रणात मदत करते. इतकंच नाही तर बीपी, सूज आणि कोलेस्ट्रॉलची समस्याही कमी होण्यास मदत होते.
-
रवा हा आहारातील फायबरचा चांगला स्रोत आहे, ज्यामुळे ते रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्याचे काम करते. यासोबतच हे पचनसंस्था दुरुस्त करण्याचे काम करते.
-
रवा हा थायमिन, फोलेट आणि जीवनसत्त्व-ब चा देखील चांगला स्रोत आहे, जो तुम्हाला जास्त खाण्यापासून देखील प्रतिबंधित करतो.
-
(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)
-
(फोटो-संग्रहित छायाचित्र)
