-
आयुर्वेदानुसार काही पदार्थ पचायला जड असतात, त्यामुळे त्यांचे रोज सेवन करू नये.
-
पापडीची भाजी ही पचनास जड असून त्याने वात आणि पित्त वाढू शकते.
-
पापडी शुक्राणुसाठी हानिकारक असून रक्ताशी निगडित विकरासाठीदेखील अपायकारक ठरू शकते.
-
लाल मांस पचनासाठी जड असून त्याने बद्धकोष्ठतेचा त्रास उद्भवतो.
-
लाल मांसाच्या अतिसेवनामुळे आतड्यांचा कॅन्सर होण्याची शक्यता असते.
-
वाळवलेल्या भाज्या पचनासाठी जड असून त्यांच्या अधिक सेवनामुळे वात वाढू शकतो.
-
आयुर्वेदानुसार मुळा एक औषधी आणि गुणकारी भाजी असून त्यात कफ संतुलित राखण्याची क्षमता आहे.
-
कच्चा मुळा पोटॅशियम पातळी आणि थायरॉईडच्या कार्यावर परिणाम करतो.
-
मुरवलेले पदार्थ खाणे टाळावे कारण त्यात गरजेपेक्षा जास्त उष्णता तयार झालेली असून त्याने जळजळ वाढते.
-
आंबवलेल्या पदार्थांच्या अतिसेवनामुळे पित्त आणि रक्ताशी संबंधित आजार निर्माण होऊ शकतात.
-
येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. (Photos: Pexels)
