-
२२ एप्रिल २०२३ रोजी सूर्यदेव आणि गुरुदेव एकत्र मेष राशीमध्ये असतील. तब्बल १२ वर्षांनी हे ग्रह युती करणार असून या युतीचा प्रभाव सर्वच राशींवर पडणार आहे. मात्र अशा काही राशी आहे ज्यांना ही युती अत्यंत शुभ सिद्ध होऊ शकते.
-
ज्योतिषशास्त्रात सूर्य आणि गुरु या दोन ग्रहांना अतिशय शक्तिशाली ग्रह मानले गेले आहे. सूर्याला आत्मा तर गुरु ग्रहाला जीवनाचे कारक मानले गेले आहे. अशा स्थितीत या दोन ग्रहांचे एकत्र येणे अत्यंत शुभ आहे.
-
ज्योतिषशास्त्रानुसार १४ एप्रिलला सूर्यदेव मेष राशीमध्ये संक्रमण करणार असून २२ एप्रिलला गुरुदेवसुद्धा मेष राशीमध्ये प्रवेश करतील. या दोन बलाढ्य ग्रहांच्या युतीमुळे काही राशींच्या नाशिबाचे दार उघडू शकते.
-
मेष- या राशीच्या लोकांसाठी गुरू आणि सूर्याचा योग खूप खास ठरू शकते. या राशीच्या लोकांसाठी ही युती शुभ आणि फलदायी सिद्ध होऊ शकते कारण ही युती याच राशीत होणार आहे. त्याच्या प्रभावाने, सर्व कार्य यशस्वी होऊ शकतात.
-
नोकरीच्या ठिकाणी प्रगती होऊ शकते. तसेच नवीन व्यवसायाला चालना मिळू शकते. त्यामुळेच या लोकांची आर्थिक बाजुही मजबूत होण्याची संभावना आहे. उत्पन्नाचे नवे स्त्रोत तयार होण्याची शक्यता असून अचानक धनलाभ संभवतो.
-
जोडीदारबरोबरचा समन्वय पूर्वीपेक्षा चांगला होऊ शकतो. या युतीमुळे नाशिबाचे नवे दार उघडून सर्जनशील कार्यात फायदा होऊ शकतो. या काळात मेहनतीचे पूर्ण फळ मिळू शकते.
-
मिथुन- मिथुन राशीच्या लोकांना गुरु आणि सूर्य यांच्या संयोगाने विशेष लाभ होऊ शकतो. ज्यांना नवीन व्यवसायात भागीदारी करायची आहे त्यांच्यासाठी हा काळ खूप चांगला ठरू शकतो. अनेक नवीन संधी मिळू शकतात. यावेळी करिअरमध्ये नवीन उंची प्राप्त होऊ शकते आणि विद्यार्थ्यांना शिक्षणात यश मिळण्याची शक्यता आहे.
-
या संयोगाने मिथुन राशीच्या लोकांसाठी अनपेक्षित आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. नोकरी आणि व्यवसायात नवीन संधी मिळू शकतात. बेरोजगारांना नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. दुसरीकडे, जे आधीच नोकरीत आहेत त्यांना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळू शकते.
-
तूळ- सूर्य-गुरूच्या युतीमुळे तूळ राशीच्या लोकांना फायदा होण्याची संभावना आहे. आर्थिक लाभ होऊ शकतो. तसेच, व्यवसायातही यश मिळू शकते. मात्र, यावेळी खर्च वाढण्याची संभावना आहे. त्यामुळे बचतीची काळजी घ्यावी लागू शकते.
-
सूर्य-गुरु युतीमुळे या लोकांचे वैवाहिक जीवन सुधारू शकते. ज्यांच्या वैवाहिक जीवनात अडथळे येत होते, ते आता दूर होऊ शकतात. कौटुंबिक जीवनही चांगले राहू शकते. भागीदारीमध्ये सुरू केलेल्या कामातून नफा मिळू शकतो.
-
येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. (File Photos)
