-
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रहाचा विशिष्ट अंतराने उदय होतो आणि ते अनेक शुभ आणि अशुभ योग तयार करतात. ज्याचा परिणाम मानवी जीवनावर, देशावर आणि जगावर पडतो.
-
अशातच आता शनिदेवाचा ९ मार्च रोजी उदय झाला आहे. त्यामुळे ‘शश महापुरुष’ राजयोग निर्माण झाला आहे. ज्योतिष शास्त्रामध्ये हा योग अत्यंत शुभ आणि फलदायी मानला जातो.
-
ज्योतिषशास्त्रानुसार शनी हा आपल्या कर्माची फळ देतो असं मानतात. त्यामुळे जेव्हा शनी ग्रहाबद्दल कुठलीही हालचाल होते त्याचा परिणाम आपल्या नशीबावर पडतो. सध्या शनीचा उदय झाला आहे.
-
या राजयोगाचा प्रभाव सर्व राशींच्या लोकांवर दिसणार आहे. पण तीन राशी अशा आहेत, ज्यांच्यासाठी संपत्ती आणि प्रगतीचा योग बनत आहे. चला तर जाणून घेऊया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी…
-
मिथुन राशीच्या लोकांसाठी शनिदेवाचा उदय चांगला ठरू शकतो. कारण मिथुन राशीच्या नवव्या स्थानी शश राजयोग तयार होत आहे. त्यामुळे या काळात तुम्ही भाग्यवान होऊ शकता. तसेच, या काळात तुम्हाला लांबचा प्रवास घडू शकतो.
-
ज्या विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घ्यायचे आहे, त्यांची इच्छा पूर्ण होऊ शकते. त्याचबरोबर धार्मिक कार्यात तुमची आवड वाढू शकते. या काळात तुम्हाला उत्पन्नाचे इतर स्त्रोतदेखील मिळू शकतात. तुम्ही कोणतीही मालमत्ता किंवा वाहन खरेदी करू शकता.
-
शनिदेवाचा उदय तुमच्यासाठी आनंददायी आणि लाभदायक ठरू शकतो. कारण तुमच्या राशीच्या सप्तम भावात हा योग झाला आहे. हे भागीदारी आणि वैवाहिक जीवनाचे स्थान मानले जाते. त्यामुळे या काळात सर्वांशी तुमचे नाते घट्ट होऊ शकते ज्यामुळे तुमच्या आयुष्यातील यशाचा टप्पा सुरू होण्याची शक्यता आहे.
-
तसेच या काळात जे अविवाहित आहेत त्यांना लग्नासाठी स्थळ येऊ शकतात. शिवाय तुमच्या करिअरमध्ये यश आणि करिअरमध्ये उत्कृष्ट संधी मिळू शकतात. दुसरीकडे, जे व्यावसायिक आहेत त्यांना चांगला फायदा होऊ शकतो. नोकरदार लोकांना त्यांच्या नोकरीत बढती आणि वेतनवाढ मिळू शकते.
-
शनिदेवाचा उदय तुमच्यासाठी शुभ आणि फलदायी ठरू शकतो. कारण यावेळी तुमच्या गोचर कुंडलीच्या लग्न स्थानी शश नावाचा राजयोग तयार झाला आहे. या राजयोगामुळे कुंभ राशीच्या लोकांचे भाग्य बदलणार आहे. त्यामुळे या काळात तुम्ही पैशांची बचत करण्यात यशस्वी होऊ शकता आणि शिवाय तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होण्याचीही शक्यता आहे.
-
तसेच तुमच्या व्यक्तिमत्त्वात सुधारणा होऊ शकते. शिवाय शश योगाची नजर तुमच्या जीवनसाथी आणि भागीदारीच्या स्थानावर आहे. त्यामुळे जर तुम्ही व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला यश मिळू शकते. कुंभ राशीच्या लोकांना त्यांच्या जीवनसाथीचा पूर्ण पाठिंबा मिळू शकतो. करिअरमध्येही प्रगती होण्याती शक्यता आहे.
-
(टीप: वरील दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.)

लग्नाच्या हॉलमध्ये भीषण आग, वधू-वरासह १०० जणांचा होरपळून मृत्यू, १५० हून अधिक जखमी