-
आपल्या निरोगी आरोग्यासाठी शांत आणि चांगली झोप अतिशय आवश्यक आहे. मात्र तरीही अनेकदा याकडे सहज दुर्लक्ष केले जाते.
-
एखाद्या रात्री जर आपली झोप पूर्ण झाली नाही, तर आपला पुढचा संपूर्ण दिवस खराब होऊ शकतो. आपल्याला ऊर्जेची कमतरता जाणवू शकते. तसेच आपल्याला लक्ष केंद्रित करण्यात अडचणी येऊ शकतात.
-
याच कारणांमुळे दररोज संत ते आठ तासांची नियमित झोप घेणे अतिशय गरजेचे आहे.
-
बऱ्याच लोकांना शांत झोप लागण्यात अडचणी येतात. यामुळे ते आजारीही पडतात.
-
आज आपण झोपेशी संबंधित अशा काही चुका जाणून घेणार आहोत, ज्यांचा आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो.
-
दिवस संपत असताना उशिरा कॅफिनचे सेवन करू नये. कारण ते आपल्या शरीरात आठ तासांपर्यंत राहू शकते. यामुळे आपल्याला झोप लागण्यात अडचणी येऊ शकतात.
-
रात्रीचे जेवण जड झाल्यास अपचन आणि अस्वस्थता जाणवू शकते. यामुळे नीट झोप लागत नाही. म्हणूनच रात्रीचे जेवण हलके असावे. तसेच जेवण आणि झोपण्याची वेळ यामध्ये किमान दोन तासांचे अंतर असावे.
-
झोपण्यापूर्वी इलेक्ट्रॉनिक उपकरण, जसे की टीव्ही, मोबईल, लॅपटॉप इत्यादींचा वापर केल्यास शरीरातील मेलाटोनिनच्या उत्पादनावर परिणाम होतो आणि चांगली झोप लागत नाही.
-
म्हणूनच झोपण्यापूर्वी या उपकरणांचा वापर करू नये. मन शांत ठेवण्यासाठी पुस्तके वाचावी किंवा ध्यान करावे.
-
आपण जिथे झोपतो त्या जागेचाही आपल्या झोपेवर प्रभाव पडत असतो. म्हणूनच झोपण्याच्या खोलीमध्ये शांतता, अंधार आई पुरेसा थंडावा असावा.
-
आपल्या शरीराचे एक विशिष्ट चक्र असते. त्यामुळे आपल्या झोपेची वेळ निश्चित करा. असे केल्याने आपल्याला ठराविक वेळेला आपोआप झोप येईल. सुट्टीच्या दिवशीही हे वेळापत्रक पाळा.
-
येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. (फोटो : Freepik)

“मोहितने पहिले चार चेंडू चांगले टाकले, पण अचनाक तिथे…”, सुनील गावस्करांनी ‘त्या’ प्रकारावरून हार्दिक पांड्याला फटकारलं