-
शनिदेवाला न्यायाचा देवता म्हटलं जातं. शनि लोकांना त्यांच्या कर्मानुसार फळ देतो. यंदा तब्बल ३० वर्षांनी शनिदेव स्वराशीत म्हणजेच कुंभ राशीत स्थिर झाले आहेत. २०२५ पर्यंत तो तिथेच मुक्कामी असणार आहे.
-
या गोचराने काही राशींच्या कुंडलीतून शनीची महादशा व साडेसाती तसेच धैय्या (अडीच वर्ष टिकणारा प्रभाव) संपुष्टात आला आहे.
-
ज्योतिष तज्ज्ञांच्या माहितीनुसार पुढील अडीच वर्ष शनिदेव ज्या राशीत स्थिर असणार आहेत त्या राशी योगायोगाने शनीच्या प्रिय राशी मानल्या जातात. म्हणजेच शनीचा प्रभाव या राशींवर वाईट नव्हे तर उलट अधिक लाभदायी दिसून येऊ शकतो.
-
अडीच वर्ष म्हणजेच साधारण २०२५ पर्यंत तीन राशींवर शनीची कृपा कायम राहण्याची शक्यता आहे. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी..
-
शनिदेव आपल्या राशीच्या गोचर कुंडलीत दहाव्या स्थानी स्थिर असल्याने येथे या वर्षभरात शश महाराजयोग तयार होत आहे. ही स्थिती पुढील अडीच वर्ष कायम असणार आहे. या राशीसाठी शनिदेवाचे संक्रमण शुभ ठरु शकते.
-
व्यवसायासाठी पुढील दोन वर्ष अत्यंत लाभदायक सिद्ध होऊ शकतात. या काळात तुम्हाला तुमच्या कामात यश मिळू शकतो. तुम्हाला नशिबाची साथ लाभल्याने व भाग्यभावात शनिदेव स्थिर असल्याने तुम्हाला शनीचा आशीर्वाद लाभू शकतो.
-
मिथुन राशीच्या नवव्या स्थानी शनी देव स्थित आहेत त्यामुळे तुम्हाला नशिबाची साथ लाभू शकते. येणारी अडीच वर्षे तुम्हाला राजयोग असल्याने तुम्हाला कामाच्या दरम्यान प्रवास करावा लागू शकतो.
-
तसेच आध्यत्मिक विकासाने तुमची मानसिक स्थिती शांत व निवांत राहू शकते. नोकरदार मंडळींना करिअरमध्ये मोठी झेप घेता येईल तसेच स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना यश लाभू शकते. अविवाहितांना लग्नाचा प्रस्ताव येऊ शकतो.
-
कुंभ राशीत पुढील अडीच वर्ष शनिदेव स्थिर असणार आहेत व त्याचा शुभ प्रभाव तुमच्या कामावर व प्रगतीवर दिसून येऊ शकते. शनिदेव पुढील अडीच वर्षात तुमच्या स्वप्नांना दिशा देऊ शकतील तसेच कौटुंबिक सुखही तुमच्या भाग्यात दिसून येत आहे.
-
सूर्य व राहू भ्रमणाने तुमच्या राशीवर २०२३ च्या मध्यात काहीसा संकटाचा काळ येऊ शकतो पण या ही वेळेस शनिदेव तुमची ढाल बनू शकतील. तुमची आर्थिक स्थिती भक्कम होऊन तुम्हाला गुंतवणुकीचा मोठा फायदा होऊ शकतो. वाडवडिलांच्या संपत्तीमुळे तुम्हाला प्रचंड मोठी धनलाभाचे संधी मिळू शकते.
-
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

कल्याण-डोंबिवलीत ‘होऊ द्या चर्चां’च्या चौक सभा; शिवसेना ‘उबाठा’तर्फे आयोजन