-
आपल्या शास्त्रात अन्न खाण्याचे नियम सांगितले आहेत.
-
जेवताना नियमांचे पालन करणे आवश्यक आहे, असं म्हटलं जाते.
-
बरेचदा आपल्या लक्षात असेल की अनेक लोक अन्न खाण्यापूर्वी ताटाच्या चारही बाजूनी पाणी शिंपडतात.
-
पण जेवण करण्यापूर्वी ताटाभोवती पाणी का शिंपडले जाते, तुम्हाला माहिती आहे का?
-
हे काम करण्यामागे धार्मिक आणि वैज्ञानिक दोन्ही कारणे सांगितली आहेत.
-
पाणी शिंपडून आणि मंत्रांचे पठण करूनच अन्न सुरू करण्याची ही परंपरा खूप पूर्वी पासून चालत आली आहे.
-
धर्मग्रंथात या परंपरेचा उल्लेख करताना असे लिहिले आहे की, अन्न खाण्यापूर्वी पाणी शिंपडणे म्हणजे अन्नाचा आदर करणे होय.
-
उत्तर भारतात त्याला आमचन आणि पानाच्या बाहेर जी चार शीतं ठेवली जातात त्याला चित्रा आहुती म्हणतात. त्याच वेळी, तामिळनाडूमध्ये या परंपरेला परिसेशनम म्हणतात.
-
या परंपरेला शास्त्रीय कारणंही आहे. खरे तर पूर्वीचे लोक जमिनीवर बसून जेवत असत.
-
अन्न खाताना किडे आणि कीटक अन्नावर बसू नये, म्हणून जेवणाच्या ताटाभोवती पाणी शिंपडले जात असत.
-
पूर्वीच्या काळी सारावलेल्या जमिनीवर जेवणाचे पान वाढले जायचे. त्यामुळे आजुबाजूने कोणी चालत गेल्यास सहाजिकच जमिनीवरील धूळ, माती पानात उडली जात असते. त्यामुळे पाणी शिंपडल्याने ताटाभोवती असलेली धूळ आणि मातीही जागी बसत असे.
-
(फोटो सौजन्य : pixels)

निरीक्षण करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यानी केला पॅरामोटरचा उपयोग! Video पाहून नेटकरी म्हणाले; भविष्यात ड्रोन…