-
राम-सीता हे रामायणातील एक आदर्श जोडपं मानलं जातं. पती-पत्नीच्या नात्यातील गोडवा हा राम-सीतेसारखा असावा, असं म्हणतात. (Photo : Pexels)
-
अनेक जण एखाद्या जोडीचं कौतुक करताना राम-सीतेचं नाव आवर्जून घेतात. (Photo : Sita Swayamvar, Ramayan Tv serial)
-
नवरा-बायकोच्या नात्यात प्रेम, काळजी, जिव्हाळा, समजूतदारपणा या गोष्टी असणं गरजेचं आहे. रामायणात वर्णन केल्याप्रमाणे या सर्व गोष्टी राम-सीतेच्या नात्यात दाखवण्यात आल्या आहेत. (Photo : Pexels)
-
तुमची जोडी राम-सीतेसारखी आहे का? आज आम्ही तुम्हाला याविषयीच सविस्तर सांगणार आहोत. (Photo : Pexels)
-
जर तुमच्या नात्यात एकमेकांविषयी आदर असेल, तर तुमची जोडी राम-सीतेसारखी आहे, असं समजावं. जर जोडीदार तुमच्या विचारांना आणि भावनांना अधिक महत्त्व देत असेल, तर तुम्ही चांगल्या नात्यात असण्याचं ते एक उत्तम लक्षण आहे. (Photo : Pexels)
-
कोणत्याही नात्यात संवाद हा खूप महत्त्वाचा घटक आहे. संवादाशिवाय कोणतंही नातं अपूर्ण आहे. जर तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर कोणत्याही गोष्टीवर चर्चा करीत असाल किंवा संवाद साधत असाल, तर तुम्ही एका चांगल्या व्यक्तीच्या सहवासात आहात. याचा सकारात्मक परिणाम तुमच्या नात्यावर दिसून येईल. (Photo : Pexels)
-
एक चांगला जोडीदार नेहमी तुम्हाला चांगल्या कामांसाठी प्रोत्साहन देत असतो. तुमची स्वप्नं आणि इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला मदत करीत असतो. अडचणीच्या वेळी तो खंबीरपणे तुमच्याबरोबर उभा राहतो. (Photo : Pexels)
-
प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्त्व हे वेगवेगळे असते. दोन वेगवेगळ्या स्वभावाच्या व्यक्ती जेव्हा एकत्र येतात तेव्हा मतभेद होणे साहजिक आहे. नवरा-बायकोच्या नात्यातसुद्धा मतभेद दिसून येतात. अशा वेळी आपापसांतील मतभेद लवकरात लवकर दूर करण्यासाठी नवरा-बायको दोघांनीही प्रयत्न करणे गरजेचे आहे. (Photo : Pexels)
-
नवरा-बायकोचं नातं हे कधीही एकतर्फी नसावं. या नात्यात दोघांकडूनही नातं जपण्याचा प्रयत्न व्हायला हवा. फक्त नात्यात एकच व्यक्ती नातं जपण्यासाठी तडजोड करीत असेल, तर असं नातं अधिक काळ टिकत नाही. (Photo : Pexels)

“महिला कुस्तीपटूंचं शोषण करण्याची एकही संधी सिंह सोडत नव्हते”, दिल्ली पोलिसांचा न्यायालयात दावा